
दखल न्युज भारत विशेष
भारतात असो की कोणत्याही देशात, व्यवस्था जर गुलामीची असेल तर त्या व्यवस्थेचे प्रत्येक घटक हे गुलामच असतात. गुलामीचे च जीवन जगत असतात.गुलामी याचा अर्थ परावलंबी आणि स्वाभिमानहिन जीवन, स्वातंत्र्यहिन जीवन,गुलामाला स्वातंत्र्य नसते,समतेची वागणूक मिळत नाही,त्याच्यात बंधुभाव नसतो,त्याला न्याय मिळत नाही.गुलामीच्या व्यवस्थेत विषमता असते,शोषण,अन्याय,अत्याचार ,भ्रष्टाचार असतो,मालक आणि नोकर मजूर कामगार असतात.
मालक हा ऐतखाऊ असतो,श्रमिक हा कष्टकरी असतो,ऐतखाऊ म्हणजे बुध्दीचे आणि कष्टाचे काम न करणारा,कसलेही काहीही काम न करता ऐतेच सुख उपभोगनारा माणूस किंवा मालक.मालक आणि ऐतखाऊ लोक हे जनतेची पिळवणूक ,शोषण करून जीवन जगत असतात,आर्थिकदृष्ट्या श्रीमंत होतात,शोषण हे महागाई , भ्रष्टाचार,व्यसन,व्याज,सत्ता , खाजगी मालमत्ता ( शेती कारखाना उद्योग व्यापार कंपनी संस्था ) यातून केल्या जाते.उत्पादनांची साधने ज्यंचेकडे कमी अधिक प्रमाणात जयांचेकडे असतात,ते त्यांचे मालक,हे मालक त्यांचे कर्मचारी श्रमिक नोकर यांचे आर्थिक सामाजिक शोषण करीत असतात,त्यातूनच ते श्रीमंत होतात.यामुळे गरीब ,मध्यम,श्रीमंत असे आर्थिक वर्ग निर्माण होतात.आर्थिक विषमतेची व्यवस्था ही खाजगी मालमत्तेचा मालकी हक्क यातून निर्माण होते.ही आर्थिक विषमता टिकविण्यास जाती धर्म पूरक ठरतात.म्हणूनच जातीचे पुढारी,राजकीय पुढारी,धर्माचे महाराज ,पुजारी या तिघांचे साटेलोटे असते.हे तिघेही शोषक असतात.
आर्थिक विषमता ,सामाजिक विषमता असलेली व्यवस्था,आणि अशा व्यवस्थेत शोषक आणि शोषित,गुलाम मालक यांचेत नेहमीच संघर्ष असतो,हा संघर्ष वाटणी चां असतो.मालकीचा असतो.शेती कारखाना कंपनी उद्योग व्यापार कोणतेही आर्थिक क्षत्र असो की ,धर्माची मठ असोत तिथे आपल्याला आर्थिक फायदा कसा होईल? याची प्रेरणा त्यात काम करणारे लोक पाहत असतात.मग ते मालक मठाधीश किंवा त्यांचे नोकर शिस्य असतील.त्यांचेत्त अंतर्विरोध असतात,त्यातून कायम संघर्षच्याच्या टेन्शन मध्ये असतात.
शोषण अन्याय अत्याचार हे विषमतावादी व्यवस्थेचे वैशिष्ठ्य असतात.मालक अधिकारी महाराज पुजारी हे श्रमिक शिस्या चे श्रम आणि वेळ यांचे शोषण करत असतात.विषमता ही शोषणाची व्यवस्थाच असते.आणि विषमतेच्या व्यवस्थेत मालक मजुरावर,अधिकारी मालकावर,आणि श्रमिक मालकावर,कर्मचारी अधिकाऱ्यावर अवलंबून असतात.अर्थात परवलंबान हे विषमतावादी व्यवस्थेचे वैशिष्ठ्य असते.शोषण अन्याय अत्याचार भ्रष्टाचार अनैतिकता हे या व्यवस्थेची निर्मिती असते.मालकाची अधिकाऱ्यांची महाराजांची दहशत हुकुमशाही ही श्रमिक कर्मचारी शीस्य यांचेवर असते.म्हणजेच हुकुमशाही हे विषमतेच्या समाजव्यवस्थेचे वैशिष्ठ्य होय.
विषमतेच्या व्यवस्थेत भांडवली लोकशाही असते.याचा अर्थ ज्याचेकडे भांडवल असते,म्हणजे पैसा धन संपती शेती कारखाने संस्था असतात,म्हणजे जे मालक असतात तेच निवडून येतात,आणि त्यांनाच मतदार निवडून देतात,कारण मतदार हा प्रतीनिधीवर आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या अवलंबून असतात.म्हणून मालकच निवडून येतात,श्रमिक,नोकर,कर्मचारी निवडून येऊ शकतं नाहीत.भांडवली लोकशाहीत मतदार हा नेत्यांचा गुलाम असतो.आणि नेता हा भांवलदार आणि धर्म मार्तंड यांचा गुलाम असतो.याचा अर्थ विषमतेची व्यवस्था म्हणजे गुलामीचीच व्यवस्था होय.यात सारेच एकमेकांचे गुलाम असतात.कारण एकमेकावर अवलंबून असतात आणि एकमेकांचे शोषण अन्याय अत्याचार करण्याचे प्रयत्न करीत असतात.
या विषमतेच्या व्यवस्थेत मोठे मासे छोट्या माशांना खाऊन आपला उदरनिर्वाह करतात.ऐश जीवन जगतात.आणि छोटे मासे संघटित होऊन मोठ्या मशावर हल्ला करतात.जंगलातील प्राण्यांचे पण असेच वर्तन ,आणि गाव शहरातील माणसांचे पण असेच वर्तन असते.मोठे गुलाम आणि छोटे गुलाम एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात.
म्हणून जोपर्यंत ही विषमतावादी व्यवस्था,विषमतेची व्यवस्था नष्ट होऊन समतेची आर्थिक आणि सामाजिक व्यवस्था प्रस्थापित होणार नाही,ती पर्यंत हुकुमशाही,शोषण,अन्याय,अत्याचार,भ्रष्टाचार ,अनैतिकता नष्ट होणार नाहीत.
अर्थात समतेची व्यवस्था कशी आणायची हे महामानव यांनी आणि कार्ल मार्क्स सारख्या जागतिक विचारवंताने सांगितला आहे.तो वाचकांनी समजून घ्यावा.
लेखक :- दत्ता तुमवाड