सातारा येथे आठवले समाजकार्य महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर…

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

           आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुरच्या रासेयों पथकाचे वतीने विशेष अमसंरकार शिबिर युथ फॉर माय भारत आणि डिजीटल लिटरसी अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना शिबिर तालुक्यातील मौजा सातारा येथे घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

          यावेळी अध्यक्ष म्हणुन सरपंच गजानन गुडधे, उद्घाटक पी. एस. आय. दिप्ती मजकाम, प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. शुभांगी लुंगे, मुख्याध्यापक अभिजीत साटोणे, पोलीस पाटील सावसाकडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश माळवे, ग्रामपंचायत अधिकारी जितेंद्र गुप्ता, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कोडापे, अंगणवाडी सेविका पुष्पा माळवे, पोलीस झिलपे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. राजु कसारे, प्रा. डॉ. गजानन बन्सोड, पदमाकर डुकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

            मौजा सातारा येथे राष्ट्रीय सेवा योजना ७ दिवशीय निवासी शिबिराचे उद्घाटन झालेल. दरवर्षी शिबिर सातारा येथे व्हावे व ग्रामविकास व्हावे असे मत सरपंच गजानन गुडधे यांनी व्यक्त केले. तर प्राचार्य डॉ. शुभांगी लुंगे मार्गदर्शनात म्हणाल्या की, शिबिराचा उद्देश सुव्यवस्थित पुर्ण होवुन गाव जागृत होवुन ग्रामाचा सर्वांगीण विकास साधला जावा.

          याप्रसंगी इतरांनी मार्गदर्शन करून ग्रामस्थाना व विद्यार्थ्यांना उ‌द्बोधन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. गजानन बन्सोड यांनी केले. उपस्थितांचे रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. राजु कसारे यांनी केले.