प्राचार्य दिपक मुंगसे यांचा सेवानिवृत्तीपर गौरव समारंभ संपन्न…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत तीन दशकांहून अधिक काळ ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे माजी प्राचार्य दिपक मुंगसे यांचा शिक्षक ते अभ्यासू प्राचार्य ही त्यांची यशस्वी शैक्षणिक कारकीर्द एका व्रतस्थ शिक्षिकाचा प्रवास असल्याचे मत हभप डॉ.नारायण महाराज जाधव यांनी व्यक्त केले.

           ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत एकूण ३६ वर्षे ज्ञानदानाची अविरत सेवा बजावून विद्यार्थी प्रिय व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राचार्य दिपक मुंगसे नुकतेच सेवानिवृत्त झाले.

            यानिमित्ताने आयोजित केलेल्या सेवापुर्ती सदिच्छा समारंभात मान्यवरांच्या व विद्यार्थ्यांच्या अनुभव विश्वातून दिपक मुंगसे सर यांच्या जीवनातील अनेक विविध पैलूंचे दर्शन घडले.

            या सेवापुर्ती सदिच्छा समारंभास डॉ.नारायण महाराज जाधव, खा.डॉ.अमोल कोल्हे, खा.संजय जाधव, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, सचिव अजित वडगांवकर, खजिनदार दिपक पाटील, विश्वस्त प्रकाश काळे, प्राचार्य सुर्यकांत मुंगसे, मुख्याध्यापक प्रदिप काळे, सुधीर मुंगसे, डॉ.राम गावडे, विलास कुऱ्हाडे, चेअरमन बाबुलाल घुंडरे, विठ्ठल शिंदे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.    

           सत्काराला उत्तर देताना मुंगसे सर यांनी, माझ्या आजवरच्या शैक्षणिक वाटचालीत कुटुंबीयांची खंबीर साथ मिळाल्यामुळेच आपण जीवनात यशस्वी झाल्याचे सांगितले.

             नोकरीच्या ठिकाणीही माझे वरिष्ठ तसेच सर्व सहकारी यांनी मला साथ दिल्यामुळेच, तीन दशकांची यशस्वी शैक्षणिक वाटचाल करता आली,असे उद्गार काढले.

          प्राचार्य दीपक मुंगसे यांचा शाळा व संस्थेच्या वतीने भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर विद्यार्थी वर्गाकडून सरांना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.