दुखःद् निधन वार्ता… श्री.दसाराम गोंदुजी अतकारी यांचे निधन..

 

जिल्हा प्रतिनिधी भंडारा..

लाखनी:-शैक्षणिक-सामाजिक व पेंशनर्स असोसिएशन क्षेत्रातील नामवंत व्यक्तीमत्व माजी केंद्रप्रमुख-राष्ट्रपती शिक्षक पुरस्कृत आदरणीय श्री.दसाराम गोंदुजी अतकारी हल्ली मुक्काम लाखनी (मुळ गाव-सोमलवाडा)यांचे दि. 24 जानेवारी 2024 रोज बुधवारला दुपारी 1वाजता वृद्धपकाळाने 80 व्या वर्षी दुखःद् निधन झाले. 

        ते हेमंतजी अतकारी यांचे वडील होत.त्यांच्या पाठीमागे एक मुलगा, दोन मुली व नातंवंडे असा खूप मोठा आप्त परीवार आहे. 

      त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचे डोंगर पसरले आहे.सोमलवाडा,लाखनी,मुरमाडी,सावरी व समस्त लाखनी तालुक्यात शोककळा पसरली आहे.

           तसेच त्यांच्या निधनामुळे संपूर्ण पेंशनर्स असोसिएशन व शैक्षणिक क्षेत्रात फार मोठी उणीव भासणार आहे. त्यांचावर अंत्यसंस्कार दि. 25 जानेवारी 2024 रोज गुरुवारला सकाळी 9 वाजता लाखनी येथील निवासस्थानातून पुढे सोमलवाडा येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार होणार आहे.