भाविक करमनकर
तालुका प्रतिनिधी धानोरा
श्री.साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री.जी.सी.पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचा समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास श्रीमती अंबिकाताई पूनघाटे सरपंच मोहली ग्रामपंचायत माजी सरपंच कुलपती मेश्राम,कु.नयना गावंडे उपसरपंच मोहली,प्रा.डॉ.किरमिरे,डॉ चुधरी,प्रा.डॉ.वाघ,प्रा.डॉ.जम्बेवार,प्रा.डॉ.मुरकुटे,प्रा.डॉ.झाडे,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक ज्ञानेश बनसोड हे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रभारी प्राचार्य डॉ.पंकज चव्हाण यांनी भूषविले होते.राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे सहजीवन,सहअध्ययन व सहकृती होय,विशेष शिबिराचे द्वारा समाजात राहून सामाजिक समस्या जाणून घेऊन ते सोडवण्याकरिता उत्तरदायित्वाची भूमिका बजावण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर महत्वपूर्ण आहे असे प्रा.डॉ.गणेश चुदरी यांनी मत व्यक्त केले.
केवळ पुस्तकी शिक्षण म्हणजे शिक्षण नसून समाजात राहून समाजभान ठेवून उत्तरदायित्व पार पाडणे व त्याकरिता सज्ज होण्याचे पर्याप्त माध्यम आहे असे मत श्री.कुलपतीजी मेश्राम यांनी व्यक्त केले.
विशेष शिबिराचा समारोप या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.ज्ञानेश बनसोड यांनी केले.याप्रसंगी त्यांनी श्रम संस्कार तसेच बौद्धिक सत्र,सांस्कृतिक कार्यक्रमाचे वर्णन केले.समाजातील समस्या जाणून घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून घेण्याकरता विशेष शिबिर उपयुक्त आहे असे मत सरपंच अंबिकाताई पुंघाटे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय सेवा दिनाच्या अध्यक्षीय भाषणातून आपल्या सभोवतालच्या समाजात परिस्थिती व समस्या जाणीव ठेवणे व ते सोडविण्यास स्वतः सक्षम करणे म्हणजे पर्याप्त मंच म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनाचे विशेष शिबीर होय असे मत अध्यक्ष भाषणातून डॉ.चव्हाण यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय सेवा योजनाचे विशेष शिबिराचे समारोपीय कार्यक्रमाचे संचालन डॉ.प्रियंका पठाडे रा.से.यो सहकार्यक्रम अधिकारी यांनी केले तर आभार कु.प्राची बडोदे यांनी आभार मानले.
या समारंभ कार्यक्रमास मनोज ननावरे,श्रीमती छाया चंदेल,राकेश बोंगीरवार,बालाजी राजगडे,प्रा.धाकडे ,जीवन घोरपडे, प्रशासकीय वृंद तसेच येथील ग्रामपंचायत सदस्य,ग्रामवासी,रा.से. यो.स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.