डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
एटापल्ली:- मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू समारंभ केला जातो.त्यानिमित्ताने संघटन व्हावे, एकोपा वाढावा आणि संस्कृतीचे संवर्धन व्हावे या उदात्त हेतूने एटापल्ली तालुक्यातील भगवंतराव माध्यमिक आश्रम शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला एटापल्ली तालुक्यातील महिलांचा उदंड प्रतिसाद दिसून आला.
हळदी कुंकू कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सर्व स्पर्धा आटोपल्यावर हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आले. भाग्यश्री ताई आत्राम यांनी हळदी कुंकू कार्यक्रमात उपस्थित महिलांना संसार उपयोगी भेट वस्तू दिले.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष ग्यानकुमार कौशी,राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे एटापल्ली शहर अध्यक्ष पौर्णिमा श्रीरामवार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे एटापल्ली तालुका अध्यक्ष बेबीताई नरोटे,नगरसेविका सरिता गावडे ,निर्मला हीचामी,माजी नगराध्यक्ष सरिता राजकोंडावार,माजी नगरसेविका सगुणा हीचामी,येमलीचे उपसरपंच पल्लवी खोब्रागडे तसेच शेकडो महिला उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन पोटदुखे मॅडम तर आभार झिलपे मॅडम यांनी मानले.