संपादकीय
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
प्रजासत्ताक दिन म्हणजे मुलभूत अधिकारातंर्गत देशातील तमाम नागरिकांच्या स्वातंत्र्याचा महान तथा जगप्रसिद्ध इतिहासीक दिवस.तद्वतच तमाम नागरिकांचे अधिकार अधोरेखित करणारा मानसन्मानाचा तथा अस्मिता अन्वये स्वाभिमानाचा पवित्र दिवस.म्हणूनच भारत देशातील संविधान सर्वोत्तम व सर्वोच्च आहे आणि सर्वांचे रक्षण करणारे आणि सर्वांचे हित जपणारे आहे हे स्पष्ट आहे..
पारतंत्र्याच्या काळातंर्गत इग्रज राजवट संबंधातील अनेक घटना व कहाण्या देशातील नागरिकांना दररोज सांगण्यात येतात.मात्र याच देशातील मनुस्मृती अंतर्गत जाचक व महाभयंकर जुलमी अशा कायद्याच्या वर्णव्यवस्थेला अनुसरून कहाण्या स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सांगितले जात नाही हे या देशातील नागरिकांचे दुर्दैवाने दुर्भाग्य म्हणावे लागेल किंवा समजावे लागेल.
देशात दोन प्रकारची इतिहासीक आंदोलने झाली.(एक),१) इंग्रज राजवटीला देशातून हद्दपार करण्यासाठी.(तर दुसरी) २) मनुस्मृतीच्या कायद्या अंतर्गत सर्व प्रकारचे गुलाम असलेल्या व सर्व प्रकारचे साधनहिन केलेल्या आजच्या ओबीसी-एससी-एसटी-अल्पसंख्यांक-भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांना मुक्त करण्यासाठी..
पहिल्या आंदोलनाचे नेतृत्व लोकमान्य बाल गंगाधर टिळक,महात्मा गांधी,नेताजी सुभाषचंद्र बोस,भगतसिंग,राजगुरु,सुखदेव,विनोबा भावे,आणि इतर राष्ट्रपुरुषांनी केले.
तर दुसऱ्या आंदोलनाचे नेतृत्व महात्मा ज्योतिबा फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राजश्री छत्रपती शाहू महाराज,महामानव-युगपुरुष-प्रज्ञासुर्य-प्रकांड पंडित डॉ.बाबासाहेब भिमराव आंबेडकर,रामास्वामी पेरियार नायकर,भाऊराव महर्षी कर्वे,संत गाडगेबाबा,व इतर थोर राष्ट्र समाजसुधारकांनी केले.
गांभीर्याने इतिहासिक घटनांचा व घडामोडींचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की पारतंत्र्याच्या काळातील भारत देशातंर्गत इंग्रज राजवट एवढी जुलमी नव्हती,जेवढी मनुस्मृती अन्वये कायद्याच्या अंतर्गत वर्णव्यवस्था कार्यपद्धत जुलमी होती,अन्यायकारक होती,शोषक होती,मानसामानसांना तोडणारी होती,मानसामासात भेद करणारी होती,जातीव्यवस्था निर्माण करुन जातीभेदाच्या व उच्चनीचतेच्या खाईत लोटणारी होती,सर्व बहुजनांचे अधिकार नाकारणारी होती,सर्व बहुजनांना शिक्षणाची दारे बंद करणारी होती,स्त्रियांना चुलीपर्यंत मर्यादित करुन ठेवणारी होती अर्थात त्यांचे सर्व अधिकार व मानुसपण नाकारणारी होती,एकमेकांना तुच्छ लेखणारी होती,तद्वतच बरेच काही…
दोन्ही आंदोलने स्वातंत्र्याच्या लढ्याचीच,मात्र एक आंदोलन इंग्रज राजवटीतून देशातील नागरिकांची सुटका करणारे होते तर दुसरे आंदोलन मनुस्मृती कायद्याच्या अंतर्गत वर्णव्यवस्थेच्या जुलमी बंधनातून देशातील नागरिकांना मुक्त करणारे होते..असे असले तरी मनुस्मृती कायद्याने या देशातील नागरिकांचे सर्व प्रकारचे अधिकार व हक्क नाकारले होते हा काळाकुट्ट इतिहासिक घटनाक्रम आहे.
ज्या संविधानाने या देशातील तमाम नागरिकांना सर्व प्रकारचे अधिकार व हक्क दिले त्याच संविधानाला बदलवनारी भाषा आजच्या स्थितीत या देशातील काही नालायक महाभाग ओरडून ओरडून बोलतात व देशातील नागरिकांना सांगतात भारत देशाचे संविधान अयोग्य आहे,मनुस्मृतीचे राज्य आणले गेले पाहिजे.
संविधानाचा विरोध करणारे हे नालायक महाभाग परत या देशातील नागरिकांना सर्व प्रकारे गुलाम बनवू इच्छितात व त्यांचे सर्व प्रकारचे अधिकार व हक्क नाकारु इच्छितात असे लक्षात येते.
— मनुस्मृती म्हणजे या देशातील नागरिकांना गुलाम बनविनारा आणि लाचार करणारा व त्यांचे अधिकार आणि हक्क नाकारनारा ब्राह्मणवाद्यांचा ग्रंथ तर भारतीय संविधान म्हणजे या देशातील नागरिकांचे सर्व प्रकारचे कायदेशीर रक्षण करणारा,कायदेशीर हित जपणारा,सर्व प्रकारचे कायदेशीर अधिकार व हक्क बहाल करणारा,देशातील तमाम नागरिकांचा सर्वोत्तम व सर्वोच्च असा इतिहासिक जगप्रसिद्ध महा ग्रंथ.
— ज्या मनुस्मृती सारख्या ग्रंथांनी तुमचे सर्व प्रकारचे अधिकार व हक्क नाकारले आणि तुम्हाला पिढ्यानपिढ्या दरपिढ्या गुलाम व लाचार करून ठेवले त्या मनुस्मृती कायद्याचा पुळका आणणारे देशातील नालायक महाभाग या देशातील सर्व नागरिकांचे दुष्मन आहेत हे या देशातील नागरिकांनी प्रथमतः समजून घेतले पाहिजे व नेहमी समजून घेत राहिले पाहिजे.
खुलेआम स्पष्टता सांगणारी भारतीय संविधानाची फक्त उद्देशिका या देशातील नागरिकांनी मन लावून वाचली तरी संविधानाचा विरोध करणारे स्वतः उघडे पडल्याशिवाय राहणार नाही.
***
उद्देशिका काय सांगते,
“वाचा,
“आम्ही भारताचे लोक,भारताचे एक सार्वभौमत्व समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास…
सामाजिक,आर्थिक व राजनैतिक न्याय,विचार,अभिव्यक्ती,विश्वास, श्रध्दा:,
व उपासना यांचे स्वातंत्र्य:,
दर्जाची व संधीची समानता:,
निश्चितपणे प्राप्त करून देणाचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपुर्वक निर्धार करुन:,
आमच्या संविधान सभेत….
आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमीत करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत…
***
या देशातील सर्व नागरिकांना भारतीय संविधानाने गांभीर्यपूर्वक सर्व प्रकारचे अधिकार व हक्क,त्यांचे रक्षण,संरक्षण बहाल केले असतांना,भारतीय संविधानाच्या विरोधात बोलणाऱ्यांचे छडयंत्र या देशातील नागरिकांनी वेळोवेळी ओळखले पाहिजे व जे भारतीय संविधानाच्या विरोधात बोलतात ते या देशातील नागरिकांचे दुष्मन आहेत हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे.
जगविख्यात प्रकांड पंडित तथा युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब भिमराव आंबेडकरांनी स्वातंत्र्याच्या लढाई बरोबर या देशातील सर्व नागरिकांना सामाजिक गुलामीतून मुक्त करणारी लढाई जिकरीने लढली व देशातील सर्व नागरिकांना महाभयंकर क्रुर जाचक अशा सामाजिक गुलामीतून मुक्त केले.तद्वतच भारतीय संविधानाच्या द्वारे देशातील नागरिकांना सुरक्षित केले हे या देशातील सर्व नागरिकांवर त्यांचे उपकारच आहेत..
— सरतेशेवटी २६ जानेवारी २०२३,” प्रजासत्ताक दिनाच्या, निमित्ताने या देशातील सर्व नागरिकांना दखल न्यूज भारत परिवारातर्फे सन्मानपूर्वक व मनःपूर्वक कल्याणकारी आणि मंगलमय हार्दिक शुभेच्छा!…