खेड तालुक्याचा शिवराज राक्षे ठरला यंदाचा 65वा महाराष्ट्र केसरी…

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

        पुणे : धाराशिवमध्ये गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेतील अंतिम लढाई पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी मोठी गर्दी केली आहे. आता, उत्सुकता यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ कोण होणार याची होती. आता, प्रतीक्षा संपली असून शिवराज राक्षेने हर्षवर्धन सदगिर याच्यावर गुण घेत पराभव केला. अखेर शिवराज राक्षे यंदाचा खराखुरा महाराष्ट्र केसरी ठरला. विजेत्या पैलवनास स्कॉर्पिओ आणि मानाची चांदीची गदा देण्यात आली. 

            हजारोंच्या संख्येने खचाखच भरलेलं धाराशिवचं मैदान आणि कुस्ती महाराष्ट्र केसरीची. महाराष्ट्र केसरीच्या गादी विभागातील सेमिफायनल लढतीत शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ अशी लढत झाली. या लढतीत शिवराज राक्षेने दणक्यात विजय मिळवत अंतिम लढतीत प्रवेश केला. तर, माती विभागातील कुस्तीत गणेश जगताप विरुद्ध हर्षवर्धन सदगिर यांच्या रोमहर्षक लढत झाली.

            या लढतीत हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली. त्यामुळे, यंदाच्या महाराष्ट्र केसरी लढतीसाठी शिवराज राक्षे आणि हर्षवर्धन सदगिर यांच्यात अंतिम लढत झाली. शिवराज राक्षेने 6-0 असा हर्षवर्धन सदगिरचा पराभव केला. यंदाचा महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला.

            धाराशिवच्या श्री तुळजाभवानी स्टेडियममध्ये गेल्या 4 दिवसांपासून कुस्तीचा महाआखडा गाजला. डोळ्याचं पारणं फेडणारी कुस्ती धाराशिवसह अवघ्या महाराष्ट्राने अनुभवली.