कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:-धाडसे सभागृह पारशिवनी येथे अखिल खेडुले कुणबी समाज पारशिवनीची वार्षिक सभा रविवारी (२२ जानेवारी) पार पडली. यावेळी समाजाची नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सभेत एकमताने अध्यक्षपदी रामभाऊ दिवटे यांनी फेरनिवड करण्यात आली. निवडीनंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सभेच्या अध्यक्षस्थानी गजानन बुरडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गजाननराव ढोरे, भीमराव बुरडे, भाऊराव र्भुे रे, अशोक कुथे आदींची उपस्थिती होती. अध्यक्ष रामभाऊ दिवटे यांच्या रुपाने जिल्ह्यात समाजाचे सक्षम नेतृत्व उभे राहत आहे. दिवटे यांच्यासारखे समाजातील व्यक्ती मोठी झाल्यास याचा नक्कीच समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी लाभ होणार आहे. त्यामुळे समाजबांधवांनीसुद्धा त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे, असे उपस्थित मान्यवरांनी आवाहन के ले. मुख्य कार्यकारिणी, सल्लागार समिती व मनोनित सदस्य यांची निवड सल्लागार समितीद्वारे सर्वसंमतीने करण्यात आली. मुख्य कार्यकारिणी मंडळात उपाध्यक्ष देवा ढोरे, सचिव एकनाथ दुबे, सहसचिव धर्मेश भागळकर, कोषाध्यक्ष सुरेश बागमारे, सदस्य रणजीत भागळकर, ज्ञानेश्वर राऊत, फजित सहारे, अनंता प्रधान, देविदास दिवटे, राजेंद्र दुनेदार, गणेश दिवटे, विष्णू डुंबे यांचा समावेश आहे