कमलसिंह यादव
प्रतिनिधी
कन्हान : – पिपरी येथे हिंदुहुद्यसम्राट शिवसेना प्रमुख वदंनिय मा बाळा साहेब ठाकरे यांची जयंती दुर्गा माता चौक पिपरी येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
सोमवार (दि.२३) जानेवारी २०२३ ला दुर्गा माता मंदीर चौक पिपरी येथे हिंदुहुद्यसम्राट शिवसेना प्रमुख वदंनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रामटेक लोकसभा क्षेत्राचे शिवसेना माजी खासदार मा प्रकाशभाऊ जाधव व प्रमुख अतिथी श्री दिलीप भाऊ राईकवार, मनोज कुरडकर, राधेश्याम भोयर, सचिन साळवी, प्रविण गोडे यांच्या हस्ते मंदीरा तील दुर्गा मातेचे पुजन करून मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करित तिवार मानाचा मुजरा करून अभिवादन करण्यात आले. ” मा. बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो ” च्या जय घोषात उपस्थित मान्यवरांनी पुष्प अर्पित करून अभिवादन केले. यावेळी मा. प्रकाशभाऊ जाधव हयानी हिंदुत्वाचा बुलद आवाज, हिंदुहुद्यसम्राट शिवसेना प्रमुख वदंनिय मा बाळासाहेब ठाकरे हयां च्या प्रेरणेने महाराष्ट्रातच नव्हे संपुर्ण देशात असंख्य शिवसैनिक तयार होऊन सर्व सामान्य लोकांच्या सेवे करिता कार्यरत आहे. अश्या बाळासाहेबांच्या जिवनातील विविध पैलुवर उपस्थिताना मौलिक मार्गदर्शन केले. याप्रसंगी दिलीप येलमुले, देवा चतुर, प्रशांत मसार, अत्तु खान, मोसिन गोडे, राजु गणोरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. बुंदीचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता यशवंत (बाल्या) खंगारे, सोनु कुरडकर, अमोल सुटे, विजु खडसे, कुणाल डांगे, बाबु कुरेशी, सारंग कुथे, श्रावण भोयर, तुषार येलमुले आदीने सहकार्य केले.