कमलसिंह यादव
प्रतिनिधी
कन्हान : – भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी सेना नी आणि महान नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२७ जयंती चे औचित्य साधुन कन्हान शहर विकास मंच द्वारे पराक्रम दिवस म्हणुन थाटात साजरा करण्या त आला.
सोमवार (दि.२३) जानेवारी ला नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधुन पराक्रम दिवस म्हणुन कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमा चे आयोजन संताजी नगर कांद्री येथे करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे मार्गदर्श क ताराचंद निंबाळकर यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमा ची सुरूवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे मार्गदर्श क भरत सावळे, प्रभाकर रुंघे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित सर्व मंच पदाधिकारी व सदस्यां नी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करून नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणुन थाटात साज री करण्यात आली. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव सुरज वरखडे, सहसचिव प्रकाश कुर्वे, शाहरुख खान, हरी ओम प्रकाश नारायण, सत्यराम राय सह मंच पदाधि कारी प्रामुख्याने उपस्थित होते.