ऋषी सहारे
संपादक
मुंबई –
राज्यातील हजारो पोलीस हवालदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा शासन निर्णय आज जारी करण्यात आल्याची माहिती गृहमंत्र्यालयाकडून देण्यात आली आहे.यामुळे पोलीस दलाच्या बळकटीकरणास चालना मिळेल तसेच गुन्हे रोखण्यास मदत होईल.
राज्यातील अंमलदारांना वर्षानुवर्षे सेवेनंतरही पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नसल्याने त्यांना पदोन्नतीचा लाभ देऊन अधिकारी होता यावे या दृष्टीकोनातून हा प्रस्ताव गृहविभागाने तयार केला होता.
या पदोन्नतीचा थेट फायदा भविष्यात हजारो पोलीस शिपाई हवालदार, सहायक पोलिस निरीक्षक यांना होणार, यामुळे पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्यास मदत होईल याशिवाय पोलीस दलास सद्यस्थितीत प्रत्यक्ष कामकाजाकरीता मिळणाऱ्या मानवी दिवसांमध्येही मोठी वाढ होईल .
तसेच या निर्णयामुळे पोलीस शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यास त्याच्या सेवाकालावधीत पदोन्नतीच्या 3 संधी मिळून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल, अशी माहितीही गृहमंत्र्यांनी दिली आहे.