भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अमित शाह यांच्या विरोधात ब्रम्हपूरीत काॅंग्रेसचे आंदोलन..

शुभम गजभिये 

विभागीय प्रतिनिधी 

         देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत संविधानाचे शिल्पकार,विश्वरत्न भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह,अपमानजनक विधान केले.या घटनेचे संपूर्ण देशभर तीव्र पडसाद उमटत आहेत. 

         अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ब्रम्हपूरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काॅंग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.

         डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या संसदेत अपमान करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत अमित शाह यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.सोबतच अमित शहा यांच्या प्रतिमेवर शाईफेक करण्यात आली.

       तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके,बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर,माजी जि.प.सदस्य डॉ.राजेश कांबळे,माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे,महीला काँग्रेसच्या शहराध्यक्ष योगिता आमले,अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष प्रमोद मोटघरे,कृउबा उपसभापती सुनिता तिडके,कृउबा संचालक किशोर राऊत,कृउबा संचालक दिवाकर मातेरे,कृउबा संचालक अरुण अलोने,कृउबा संचालक ज्ञानेश्वर झरकर,कृउबा संचालक ब्रम्हदेव दिघोरे,युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमीत कन्नाके,युवक काँग्रेसचे सरचिटणीस रुपेश बानबले,अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सरचिटणीस प्रा.डी.के.मेश्राम,जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार, सोमेश्वर उपासे,विजय राऊत,शांताराम रामटेके,मनमोहन ब्राडीया,नेताजी पीसे,श्रीहरी देवगडे,विलास मेश्राम,जगदीश नाकतोडे,माजी नगरसेविका जया कन्नाके,रेश्मा लाखानी,रश्मी पगाडे,कल्पना तुपट,वैभव बदन यांसह काॅंग्रेसचे पदाधिकारी तथा बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.