ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या साकोली शाखा अंतर्गत जीवन विमा अभिकर्ता भरती सुरु आहे. प्रधानमंत्री बिमा सखी योजने अंतर्गत बिमा सखीची भरती करण्याची सुरूवात साकोली शाखेतील (सी. एल. आय. ए.) पुजा नरेश कुरंजेकर यांनी केली आहे.
त्याप्रसंगी (सोम. २३ डिसें.) जवळील पिंडकेपार येथे मुख्य चौकात बेरोजगार सुशिक्षित महिलांना रोजगार देण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे साकोली शाखेतील पुजा नरेश कुरंजेकर यांच्या तर्फे अभिकर्ता भरतीचे शिबिर लावण्यात आले. यात असंख्य महिलांनी प्रतिसाद देत आपली नावे नोंद केली.
या योजनेचा मुख्य उद्देश बेरोजगार सुशिक्षित महिलांना रोजगार देणे हा आहे.भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे साकोली शाखेतील पुजा नरेश कुरंजेकर यांच्या जीवन विमा अभिकर्ता भरती बिमा सखी मोहीम मध्ये बेरोजगार महिलांनी योग्य प्रतिसाद दिला आहे.
पुजा नरेश कुरंजेकर यांनी बेरोजगार सुशिक्षित महिलांना अभिकर्ता भरती विषयी योग्य ते मार्गदर्शन केले व त्यांना विमा क्षेत्रात महिलांना बिमा सखी अभिकर्ता म्हणून काम करण्यासाठी आग्रह करीत ग्रामीण भागातील प्रत्येक गोरगरीबांना विमेचा लाभ द्यावा व त्यांच्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या विविध विमा योजनांचा लाभ घेण्यासाठी आवाहनही त्यांनी केले आहे.