डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांना पदावरून निष्कासित करा…  — बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या दर्यापूर तालुका शाखेच्या वतीने मागणी…

युवराज डोंगरे /खल्लार 

         उपसंपादक

        विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा हेतुपुरस्सर अवमान करणाऱ्या भारताचे गृहमंत्री अमित शहा यांना तातडीने पदावरून निष्कासित करण्याबाबतचे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया दर्यापूर तालुका शाखेच्या वतीने निवेदन स्थानिक उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आज (23) निवेदन देण्यात आले. 

          संविधान निर्माता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत निंदनीय टिका टिप्पणी केल्याबद्दल भारताचे गृहमंत्री अमित शहा यांना गृहमंत्री पदावरून निष्कासित करण्यात यावे अशी मागणी महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांच्या कडे सदर निवेदनातुन करण्यात आली आहे.

          भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या असामान्य कार्यामुळे संपूर्ण जगाला वंदनीय आहेत. भारत सरकारचे गृहमंत्री अमित शहा यांनी हेतू परस्पर भारतीय संविधान निर्माता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची घोर निंदा केली आहे. त्यामुळे जगातील अब्जावधी डॉ आंबेडकर यांच्या अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.या घटनेची भारत सरकार ने गंभीर दखल घ्यावी व गृहमंत्री अमित शहा याचा माफीनामा घेऊन त्याना ताबडतोब गृहमंत्री पदा वरुन निष्कासित करावे अन्यथा देश विदेशातील करोडो आंबेडकर अनुयायी अमित शहा यांचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरतील. असा गंभिर इशारा सुद्धा निवेदनातून देण्यात आला.  

          निवेदन देतेवेळी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया दर्यापूर शाखेचे पदाधिकारी, मुरलीधर राय बोर्डे, सुधिर बसवंत मधुकर चौरपगार, प्रा. देवराव चक्रे, दादाराव दुधडे, तथा भारतीय घटनेचे अभ्यासक व नागरिक हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष ऍड संतोष कोल्हे, रामदास वाघ,पंजाब प्राध्यापक एस एस डोंगरे, राज्यपाल गजभिये,नागोराव मोहोड,कैलास शिवरकर,मंदाताई गवई,बेबीताई डोंगरदिवे, वंदनाताई चव्हाण,अरुणाताई तायडे, संगीताताई खंडारे, तथा तालुक्यातील शेकडो आंबेडकर अनुयायी स्त्री पुरुष मोठ्या संख्येने हजर होते.