संपादकीय
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
जगविख्यात अर्थतज्ञ-प्रकांड पंडित,जगमान्य थोर समाजसुधारक आणि भारतीय संविधान निर्माता विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोलणारे आणि त्यांची मानहानी करणारे भारत देशातील वैचारिक दृष्ट्या अपरिपक्व नेते हे खुज्या विचारांचे असतात,हे स्पष्ट आहे.
अलिकडच्या काळात डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत अनुचित बोलणाऱ्यांची व भारत देशातील नागरिकांत कलह निर्माण करणाऱ्यांची फौज तयार करण्यात आली आहे असे दिसून येते आहे.
कारण भाजपाच्या अनेक नेत्यांनी,”भारतीय संविधानावर,कटाक्ष केला व संविधान बदलवण्याचे मनसुबे जाहीर केले.आतातर राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत अवास्तव बोलून आपल्या अकलेचे तारे तोडले.
युगप्रवर्तक तथा युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी,”पारतंत्र्याच्या काळात मनुस्मृती अंतर्गत लागू असलेल्या काळ्याकुट्ट कायद्याला,”भारतीय संविधानाद्वारे हद्दपार करुन,देशातील तमाम महिलांसह,बहुजन समाजातील नागरिकांना खऱ्या अर्थाने स्वतंत्र्य केले आणि मुलभूत व बाह्य मुलभूत अधिकारांसह इतर अधिकार बहाल केले.
तद्वतच धार्मिक आणि सामाजिक परंपरागत गुलामगिरीच्या बेड्या तोडून देशातील बहुसंख्य-बहुजन सर्व नागरिकांना आणि तमाम सर्व महिलांना मानसन्मानाने जगण्याचे विविध अधिकार बहाल केलेत.याचबरोबर धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरीतून बाहेर काढले.
पारतंत्र्याच्या काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील तमाम नागरिकांसह महिलांच्या मानसन्मानासाठी,उध्दारासाठी केलेला धार्मिक,वैचारिक,सामाजिक,सांस्कृतिक आणि स्वातंत्र्यांचा व मुलभूत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संघर्षच आजच्या वर्तमान काळात दलित,पिडीत,वंचित,मागासवर्गीय,ओबीसी,एससी,एसटी, अल्पसंख्याक,व्हिजेंटी-एन्टी,आणि इतर सर्व समाज घटकांच्या उन्नतीसाठी आणि उध्दारासाठी आधार ठरलेला आहे आणि प्रेरणा देणारा ठरलेला आहे.
याचबरोबर आपल्या विविध संघर्षातंर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील अधिकार विहिन बहुजन समाजातील नागरिकांना व देशातील सर्व महिलांना,”भारतीय संविधानाच्या माध्यमातून रक्षण-संरक्षण करणारे सर्व प्रकारचे हक्क बहाल केलेले आहेत.तद्वतच उध्दारासाठी,उन्नतीसाठी सर्व प्रकारचे मार्ग खुले केलेत.
यामुळेच या देशातील सर्व नागरिक व महिला आपल्या हक्कासाठी आणि प्रतिनिधित्वासाठी जागरुकपणे वर्तमान काळात लढा देताना दिसतात.हेच तर भाजपाच्या आणि आर.एस.एस.च्या पचनी पडत नाही हे वास्तव आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष म्हणजे या देशातील सर्व नागरिकांचा आणि सर्व महिलांचा उध्दार-उन्नती होय,शिक्षण होय, शासकीय-प्रशासकीय प्रतिनिधित्व होय,(खासदार,आमदार,इतर सर्व लोक प्रतिनिधी आणि सर्व प्रकारचे अधिकारी,कर्मचारी म्हणजे प्रतिनिधीत्व होय.) मानसन्मान,स्वाभिमान,हक्क, समानता,समता,बंधुत्व,न्याय, स्वातंत्र्य,अभिव्यक्ती स्वातंत्र्य,जगण्याचा अधिकार, बोलण्याचा आणि लिहिण्याचा अधिकार,धर्मनिरपेक्ष कृती होय.
यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याला आणि अतुलनीय शौर्याच्यि संघर्षाला,देशातील तमाम नागरिकांच्या व तमाम महिलांच्या मनातून काढणे कठीण झाले आहे,याची जाणीव भाजपाच्या शिर्ष नेतृत्वाला,नेत्यांना आणि आर.एस.एस.प्रमुखांसह इतर कार्यवाहकांना झाली आहे.याचबरोबर त्यांच्या इतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनाही झाली आहे..
“झाकली मूठ सव्वा लाखाची,”पण,हिंदूत्वला पुढे करून,”भारतीय संविधानाला,बदनाम करणारे कृत्य हे संविधान बदलवण्याचे मनसुबे उजागर करते आहे,करीत होते.
“संविधानाला नाकारणे म्हणजे,या देशातील तमाम नागरिकांच्या आणि तमाम महिलांच्या मानसन्मानाला,उन्नतीला,नाकारणे होय.त्यांच्या शिक्षणाचे सर्व मार्ग बंद करणे होय.त्यांच्या स्वातंत्र्यला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला नाकारणे होय.त्यांच्या सर्व हक्कांना नाकारणे होय.
मात्र,हिंदू हा शब्द भारतीय नाही,या शब्दाचा उपयोग इ.स.१६०० व्या शतकात मोगल बादशहांच्या राजवटीमध्ये भारत देशातील मुळ लोकांना अपमानीत करण्यासाठी केला जायचा,तद्वतच हिंदू शब्दाचा अर्थ या देशातील नागरिकांना अपमानीत करतो आहे असे बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक जगप्रसिद्ध तत्ववेत्ता वामन मेश्राम यांचे जाहीर म्हणणे आहे.
तरीही भाजपा आणि आर.एस.एस.चे नेतृत्व,”हिंदू शब्दाला,अनुसरून जन आंदोलन का म्हणून करते आहे?या देशातील नागरिकांवर काही घडामोडी अंतर्गत अत्याचार का म्हणून करते आहे?,”या त्यांच्या हेतूचा,इतिहास तपासणे गरजेचे झाले आहे.त्यांच्या मनसुब्यांच्या खोलात जाऊन त्यांचे अलोकहिताचे कार्य थांबवणे आवश्यक झाले आहे.
भाजपाच्या आणि आर.एस.एस.च्या तालमीत वाढलेले नेते हे वैचारिक दृष्ट्या संकुचित असल्याचे त्यांनी वारंवार उजागर केले आहे.
तद्वतच ते या देशातील सर्व नागरिकांचे हक्क व हित कायम अबाधित राखण्यासाठी बोलताना दिसत नाही किंवा सर्व नागरिकांचे आणि सर्व महिलांचे रक्षण करण्यासाठी बोलताना दिसत नाही.
यावरून हे लक्षात येते की,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष त्यांच्या भेदभाव पुर्ण आणि अपमान करणाऱ्या वर्तणूकीत दडलेले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करुन भाजपाला आणि आर.एस.एस.ला बरेच काही साध्य करता येईल,पण देशातील सर्व नागरिकांप्रती आणि सर्व महिलांप्रती चांगले मन,चांगले विचार,चांगली कृती,चांगले कार्य,कधीच साध्य करता येणार नाही.निष्कलंकित लोकहित साधता येणार नाही हेही तितकेच खरे आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी राज्यसभेत भारतीय संविधान निर्माता-विश्वभुषण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत काढलेले उदगार म्हणजे त्यांना न कळलेला देशातील इतिहास होय.
एवढ्या अपरिपक्व विचारांचे केंद्रीय गृहमंत्री देशाला मिळाले हे या देशातील तमाम नागरिकांचे व महिलांचे दुर्भाग्य होय,असेच म्हणावे लागेल.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर,”भारत देशाचे भाग्यविधाता आहेत हे जग मानतो आहे.आणि केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा राज्यसभेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत उपरोक्त अपमान करणारे वाक्य बोलतात,तेव्हा त्यांच्या विचारांची अप्रगल्भता बाहेर पडते आणि ते अपरिपक्व विचारांचे असल्याचे पुढे येतय.
केंद्रीय गृहमंत्री स्वर्ग आणि नरक शिध्द करुच शकत नाही हे एक सत्य आहे.अशा अंधश्रद्धाळू केंद्रीय गृहमंत्र्यांची देशाला गरज आहे का?यावर भाजपाच्या शिर्ष नेतृत्वाला काही वाटणार नाही हे सुद्धा तेवढेच घटीत आहे.
परंतु केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा हे वैचारिक दृष्ट्या लहान व्यक्तीत्व आहेत,हे त्यांच्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीतल्या उपरोक्त वाक्यावरून लक्षात घेतले पाहिजे.