बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहापूर/तालुका प्रतिनिधी इंदापूर..
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे 33/11 केवी सबस्टेशन व महावितरणचे कार्यालय आहे.
या कार्यालयातंर्गत ट्रांसफार्मर लगत खड्ड्यामध्ये अतिशय दुर्गंधी आणि घाण्याचे साम्राज्य पसरले आहे.यामुळे दुर्गंधी अंतर्गत जंतूचा प्रभाव त्या ठिकाणी जास्त प्रमाणात दिसून आलेला आहे.
पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमधील ग्रामस्थांकडून पशुपालन गोठ्यामधील दुर्गंधीयुक्त पाणी व ड्रेनेजचे पाणी त्या ठिकाणी सोडण्यात आलेले असल्याने वेळेत ग्रामपंचायतीने लक्ष घालून दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.
संध्याकाळच्या वेळेस अतिशय दुर्गंधी या ठिकाणी येत आहे.सदर साचलेल्या घाणीच्या दुर्गंधीमुळे या ठिकाणी ग्रामस्थांना आजाराला सामोरे जावे लागत आहे. महावितरण ऑफिस लगत आसणाऱ्या कुटुंबांना देखील दुर्गंधीपासून रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागलेला आहे.
डेंगू,चिकन गुनिया, मलेरिया, ताप, खोकला, सर्दी, डोकेदुखी,अंगदुखी यासारखे अनेक आजार गावातील ग्रामस्थांना झालेले आहेत.
महावितरण कंपनीमध्ये काम करीत आसलेले वायरमन, ऑपरेटर,यांना देखील दुर्गंधीला सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे.
गावामध्ये अनेक रोगराईचे प्रमाण वाढल्यामुळे दुर्गंधीचा त्रास होऊ लागला आहे.
यामुळे महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी व पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायतिने या ठिकाणी धाडसी पाऊल उचलून दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा.ज्या ज्या ठिकाणाहून ड्रेनेसचे पाणी,जनावराच्या गोठ्यातील धुतलेले पाणी येत आहे.त्या-त्या कुटुंबांना ताबडतोब सूचना देऊन आपापल्या पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी नोटीस अतंर्गत सांगण्यात यावे.
महावितरण कार्यालय हे पिंपरी बुद्रुक मध्ये आसल्यामुळे आनेक अधिकारी वर्ग या कार्यालयाला भेट देण्यासाठी नेहमीच येत आसतात.कार्यालयाच्या आजूबाजूला स्वच्छता असणे हे गरजेचे आहे.जेणेकरून त्या ऑफिसमध्ये काम करीत आसलेल्या अधिकाऱ्यांना व शेजारी राहत असलेल्या कुटुंबाला दुर्गंधीच्या व ड्रेनेजच्या पाण्यापासून त्रास होऊ नये असी ग्रामस्थांची मागणी आहे.