सुंगधीत तंबाखू विक्रेत्यावर कारवाई…

   रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी 

चिमूर:-

             चिमूर नगरपरिषद हद्दीतंर्गत वडाळा पैकु येथील दुर्गा किराना दुकानदार श्री.विलास दौलत चंदनखेडे यांच्या मारुती व्हॅन मधून 8 लाख 77 हजार 290 रूपये किंमतीचा सुग्धित तंबाखू काल जप्त केला.

           सदरची कारवाही 22 डिसेंबर शुक्रवारला दुपारी 12.30 च्या सुमारास करण्यात आली आहे.

           बऱ्याच वर्षापासून विलास चंदनखेडे वय 50 वर्ष राहणार प्रगती कॉलनी चिमूर हे आपल्या किराणा दुकानात सुगंधी तंबाखू विक्री करत होते.फिर्यादीच्या गुप्त माहितीनुसार गिरीष त्रिम्बकराव सातकर व आर.बी.यादव फूड अँड ड्रग अन्न सुरक्षा अधिकारी नागपूर यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून,”साई नगर,येथे छापा टाकला असता उभी असलेल्या मारोती व्हॅन सुपर कॅरी,रंग लाल, MH.27,BX. 4610 या क्रमांकाच्या गाडीत सुगंधित तंबाखू माल मिळाला असून कलम- 328, 188, 273 नुसार कारवाई करण्यात आली आहे.

          सदर कारवाई अन्न व औषध सुरक्षा अधिकारी व पोलीस निरीक्षक मनोज गभणे,सपोनि निलेश चवरे,पोलीस शिपाई शंकर बोरसरे,अमोल नन्नावरे यांच्या पथकाने केली असुन आरोपी फरार आहे.आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.