नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली : कर्तव्यात सदैव हजर असणारे साकोली नगरपरीषद माजी नगरसेवक अॅड मनिष कापगते यांनी साकोली तालुक्यातील विविध मागण्यांचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे.
यात साकोलीला एम आय डी सी करीता जागा सुरक्षित करून युवा बेरोजगारांच्या भविष्यासाठी उद्योगाला चालना देणे, साकोली शहरात सिव्हिल वार्ड येथील गणेश टॉकीजजवळ व्यापारी संकुल उभारण्याची अत्यंत गरज, साकोलीत बाजार यार्ड विकसित करणे, नगरपरीषद प्रशासकीय इमारतीला मंजूरी देऊन निधी उपलब्ध करणे, साकोली नगरपरीषद अंतर्गत पाणी पुरवठा योजनांचा फंड जमा करून जनतेला स्वच्छ पाणी पुरवठा करणे असे विषय असून नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक तथा माजी नगरसेवक अॅड मनिष कापगते यांनी निवेदन सादर केले आहे.