वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे
वाशिम:- महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती आयोजित गुरुवार दि. 22 डिसेंबर 22 ला विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनावर घरेलु कामगारांचा मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाची सुरुवात यशवंत स्टेडियम नागपूर येथून मोर्चाची सुरुवात करण्यात आली.
या मोर्चामध्ये महाराष्ट्रातील विविध विचारधाराचे व घरेलू कामगारांना पाठिंबा देण्यासाठी एकजूट होऊन नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर मोर्चाच्या माध्यमातून धडक दिली. झोपलेल्या सरकारला झोपेतून उठून जागे करण्यासाठी या मोर्चाची बांधणी करून घरेलू कामगारांना न्याय मिळावा व त्यांच्या मागण्या मान्य व्हावा यासाठी अनुभव शिक्षा केंद्र महाराष्ट्र अंतर्गत घरेलू कामगार मोर्चा यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. व संविधानिक मार्गाने काढलेल्या घरेलू कामगारांच्या मागण्या सरकारने तात्काळ मार्गी लावाव्या. अशासंदर्भ मध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे.या मोर्चामध्ये महाराष्ट्रातील महिलांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग पाहायला मिळाला.
या मोर्चामध्ये घोषणाबाजी आणि नारे देऊन सरकारला जागे करण्यासाठी आणि महिलांना न्याय मिळण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. त्यातच महाराष्ट्रातून आलेले विविध विचारधारेतील नागरिकांनी मोर्चाला संबोधित करण्यात आले.त्यामध्ये अनुभव शिक्षा केंद्राचे अमरावती वाशिम जिल्हा प्रशिक्षक मा.आशिष धोंगडे यांनी मोर्चाला संबोधित करून सरकारला भाषणाच्या माध्यमातून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. अशातच घरेलू कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी मोठ्या जनसमुदायांनी मोर्चा काढण्याचे निर्देश सरकारला दिले.या मोर्चामध्ये अनुभव शिक्षा केंद्र विदर्भ अमरावती,वाशिम,अकोला,भंडारा,नागपूर येथील युवकांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग पाहायला मिळाला आणि मोर्चामध्ये महिलांचा आक्रोश पाहायला मिळाला अशा प्रकारे मोर्चाला पाठिंबा देण्यात आला.
आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्यूज भारत