दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : समाजातील चांगल्या कामाच्या पाठीवर दिलेली कौतुकाची थाप पुढील वाटचालीसाठी प्रेरणा ठरत असते. त्यामुळेच चिंतामणी ज्ञानपीठाच्या वतीने कर्तृत्ववान महिलांना दरवर्षी तेजस्विनी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.
यंदाच्या वर्षीचा आळंदी येथील प्रसिद्ध गिरे भेळचे सर्वेसर्वा राजूशेठ गिरे यांच्या मातोश्री रत्नप्रभा अनंतराव गिरे तेजस्विनी पुरस्कार यांना जाहीर करण्यात आला आहे. येत्या २३ डिसेंबर २०२२ रोजी गणेश कला क्रीडा मंदिरे येथे त्यांना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
संपादक सुनिल माळी यांच्या हस्ते रत्नप्रभाताई गिरे यांना विशेष सन्मानित करण्यात येणार आहे. या प्रसंगी जवाहरशेठ चोरगे आणि विजयशेठ जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नप्रभा गिरे यांचा सत्कार होणार आहे.
समाजाला आदर्श वाटेल असे काम करणाऱ्या आणि प्रतिकूल परिस्थितीशी झगडून समाजामध्ये आदर्श निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलेला तेजस्विनी पुरस्कार देऊन दरवर्षी चिंतामणी ज्ञानपीठाच्या वतीने सन्मानित केले जाते. अशाच स्वरूपाचे मौलिक कार्य रत्नप्रभा गिरे यांनी केलेले असल्याने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.