दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचा 1100 मतांनी विजयी झाला आहे. शरद पवार यांनी प्रतिष्ठेची केलेली आंबेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चर्चेची झाली असून यामध्ये अवघ्या 1100 मतांनी दिलीप वळसे पाटील यांना विजय मिळाला आहे.
आंबेगाव मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देवदत्त निकम आणि दिलीप वळसे पाटील यांच्यामध्ये लढत होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शरद पवारांचा दिलीप वळसे पाटील यांच्यावर मोठा रोष होता. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिलीप वळसे पाटील सक्रिय राहिले नव्हते. ते आजारी असल्याने त्यांनी प्रचार देखील जास्त प्रमाणात केला नव्हता, म्हणून चर्चांना उधाण आले होते.
परंतु लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लढलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रचार सभांचा झंजावात करून देवदत्त निकम यांचा पराभव करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे.