रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
आज धडाक्यात मतमोजणीला सुरुवात होणार असून महाराष्ट्र विधानसभेचा कल कुणाकडे येणार/जाणार याकडे मतदारांच्या नजरा लागल्या आहेत.
चिमूर विधानसभा मतदारसंघात डॉ.सतीश वारजूकर आणि आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्यात लढत असून चिमूरचा आमदार कोण असणार हे आज कळणार आहे…
याचबरोबर कधी नव्हे एवढी भरमसाठ रुपयांची उलाढाल या विधानसभा निवडणुकीत झाल्यानंतरही महाराष्ट्र राज्यातील मात्तबर पराभवाच्या छायेत असल्याने अख्या देशातील व जगातील नागरिकांसह राजकीय वर्तुळात महाराष्ट्र विधानसभेच्या मतमोजणी बाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
महायुतीच्या उमेदवारांचा पराभव व्हावा असे मतदारांना वाटते आहे.पण,ईव्हीएम मशीन मध्ये काय दडलेले आहे हे संपूर्ण निकालानंतरच पुढे येणार आहे.