रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर –
समता मूलक समाजव्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून व एक बलशाली भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने या देशाला संविधान अर्पण केले तो दिवस भारतीयांसाठी सुवर्ण दिवस आहे.
या दिवसाची माहिती समस्त भारतीयांना व्हावी यासाठी,”संविधान सन्मान दिन समारोहाचे आयोजन वडाळा (पैकु) चिमूरच्या वतीने २६ नोव्हेंबर रविवारला करण्यात आले आहे.
संविधान सन्मानदिन समारोह कार्यक्रमाचे आयोजन संविधान चौक वडाळा (पैकु) चिमूर येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरचे अध्यक्ष प्रभाकर पिसे राहनार असून कार्यक्रमाचे उद्धघाटक चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया करनार आहेत.प्रमुख मार्गदर्शक नालंदा ॲकेडमी वर्धा चे अनुपकुमार हे भारताचे संविधान व त्यापूढील आव्हाने या विषयावर व्याख्यान देणार आहेत तर भूमीपूत्र ब्रिगेड महाराष्ट्र (चंद्रपूर) डॉ. समिर कदम हे भारताचे संविधान आणि भारतीय नागरिकांचे हित यांचा सहसंबध यावर भाष्य करणार आहेत,मुख्य प्रबोधक भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन अभियाच्या कविता मडावी ह्या भारताचे संविधान राष्ट्रव्यापी जनजागृतीची आवश्यकता व नागरिकांची भूमिका या अनुषंगाने अवगत करणार आहेत,तद्वतच प्रमुख अतिथी बहुजन ओबीसी महासंघ प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सतिश वारजूकर,अप्पर जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे,उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव,पो.स्टे. शेंगाव ( बु.) ठाणेदार अविनाश मेश्राम आदी उपस्थित राहनार आहे.
कार्यक्रमा दरम्यान सकाळी १० वाजता शहरातील थोर महापुरुषांच्या स्मृती स्थळांना अभिवादन करण्यात येणार आहे व बाईक रॅली होणार आहे.दुपारी २ ते ६ पर्यत वक्त्यांचे मार्गदर्शन तर सायंकाळी ७ वाजता कमलेश भोयर यांचा भिमराव एकच राजा संगितमय प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे.
त्यामूळे परिसरातील नागरीकांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन संविधान सन्मान दिन समारोह समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील तथा पदाधीकारी सदस्य यांनी केली आहे.