
रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर:-
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबई येथे शिवाजी पार्कला भव्य संविधान सन्मान महासभेचे आयोजन २५ नोव्हेंबर रोज शनिवारला करण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड.बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात संविधान सन्मान सभेचे आयोजन करण्यात आले असल्याने चिमूर तालुक्यातंर्गत वंचित बहुजन आघाडीचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबई येथील सभेला जाणार आहेत.
मुंबई शिवाजी पार्क मैदानावरील “संविधान सन्मान महासभेला” जाण्याच्या संबंधाने नियोजना करिता बैठकीचे अयोजन चिमूर येथे करण्यात आले होते.तालुक्यातून हाजारोच्या संख्येने सभेला जायचे आहे असे नियोजन करण्यात आले.
चिमूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी संविधान सन्मान सभेला जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले.
यावेळी युवा जिल्हा अध्यक्ष शुभम मंडपे,जिल्हा सल्लागार एन.आर.कांबळे,तालुका अध्यक्ष डॉ.बाळासाहेब बनसोड,तालुका महासाचिव लालाजी मेश्राम,सिद्धार्थ,चहांदे,उद्धव मोहोड,राऊत सर,विनोद येसाबरे,निखिल रामटेके,रवी शेंडे,नमन लोखंडे, प्रिन्स रामटेके, आदी उपस्थित होते.