कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशीवणी
कन्हान : – शहरातील छत्रपती शिवाजी नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्तिकी एकादशी निमित्य भाविकांनी विधिवत पूजा अर्चना करुन दिंडी यात्रा काढुन परिसरात भ्रमण करून विविध कार्यक्रमाने कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
कार्तिक एकादशी निमित्य छत्रपती शिवाजी नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध कार्यक्र माचे आयोजन करून गुरूवार (दि.२३) नोव्हेंबर ला सकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जेष्ठ मान्यवर मुल चंद शिंदेकर, भरत सावळे, जयराम तिडके, हरिभाऊ तडसे, विनायक भिलकर, रविसिंग सोलंकी सह महि लांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची विधिवत पूजा अर्चना ,आरती करुन दिंडी यात्रा काढण्यात आली. दिंडी यात्रे त भगवाग कावळे यांनी ढोलक आणि महिलांनी ताळ वाजवत दिंडी यात्रा परिसरात नगर भ्रमण करुन दिंडी यात्रेचे मंदिरात समापन करण्यात आले.
यावेळी ठिक ठिकाणी दिंडी यात्रेचे फुलाच्या वर्षावाने स्वागत करण्यात आले. मंदिरात फराळ, चाहा, वितरण आणि सायंकाळी महिलांनी मंदिरात भजन कीर्तन, आरती आणि विविध कार्यक्रमाने कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहाने थाटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमा च्या यशस्वितेकरिता अनुराग महल्ले, कृणाल सिंग राजपुत सह छत्रपती शिवाजी नगरातील नागरिकांनी सहकार्य केले. कार्यक्रमास परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहुन सहभागी झाले होते.