ऋषी सहारे
संपादक
ब्रम्हपुरी:–आल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) 19 वे तीन दिवसीय राज्य अधिवेशन नुकतेच कोल्हापूर येथे राष्ट्रीय सचिव कॉ सुकुमार दामले यांच्या उपस्थितीत पार पडले.अधिवेशनाला 36 जिल्हाती
ल 350 प्रतिनिधी उपस्थित होते.
48 प्रतिनिधींनी अंगणवाडी, आशा वर्कर व गट प्रवर्तक ,शालेय पोषण आहार कर्मचारी,कंत्राटी आरोग्य सेविका,अंश कालीन स्त्री परिचर,ग्राम पंचायत कर्मचारी,उमेद कर्मचारी यासह इत्यादी कर्मचारी बाबत 30 महत्वपूर्ण ठराव घेण्यात आले.शेवटच्या दिवशी 20 नोव्हेंबरला विशाल रॅली व जाहीर सभा दसरा चौक येथे घेण्यात आले.कामगारांच्या प्रश्नावर राष्ट्रीय नेते ड्रा भालचंद्र कांगो यांनी मार्गदर्शन केले.तीन वर्षासाठी राज्य पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.त्यात राज्य सचिव म्हणून कॉ विनोद झोडगे यांची दुसऱ्यांदा तर कॉ दिलीप बर्गी यांची राज्य कमेटी सदस्या पदी निवड करण्यात आली . असंघटित कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 28 डिसेंबर 2022 रोजी नागपूर विधान सभेवर विशाल मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
कॉ विनोद झोडगे यांच्या रूपाने चंद्रपूर जिल्ह्याला दुसऱ्यांदा राज्य सचिव पद मिळाल्याने सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.