रोहन आदेवार
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ/ वर्धा
मारेगाव: करनवाडी ते खैरी मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू होती त्यामुळे सामान्य नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत असताना मनसेने प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाने यावर दखल घेतली नाही. त्यामुळे काल मंगळावरच्या मध्यरात्रीपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात व जिल्हा उपाध्यक्ष संतोष भाऊ रोगे यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य मनसे सैनिकांनी करनवाडी ते खैरी रस्त्यावर चक्काजाम आंदोलन केले असता आज मारेगाव चे ठाणेदार राजेश पुरी यांनी आंदोलनस्थळी येऊन परत सदर मार्गाने जड वाहतूक होणार नाही असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना शब्द दिला. व करंनवाडी ते खैरी मार्गावरील जड वाहतूक बंद करण्यात आली.