नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 

साकोली : नगरपरिषद साकोली क्षेत्रातील विविध प्रभागात जनतेला होणा-या रास्त व जीवघेण्या समस्यांवर तातडीने दखल घेत उपायोजना करा अन्यथा शिवसेना ( ठाकरे गट ) महाराष्ट्र वाहतूक सेनेकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा तालुका अध्यक्ष महेश पोगळे यांचे नेतृत्वात नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी यांना ( ता. २२.) दिलेल्या जनतेच्या स्वाक्ष-यांसह निवेदनात इशारा दिला आहे. 

      निवेदनात नमूद की, प्रभाग ५ व ६ लहान बालकांच्या आरोग्यासाठी नालींची सफाई करणे, प्रभाग ५ तील विजय चेटूले घराबाजुला रिकाम्या शासकीय जागेत भरपूर घनकचरा वाढलेला असून सरपटणारे प्राण्यांपासून लहान बालकांना जीवास धोका यात ती जागा स्वच्छ करावी, प्रभाग ०६ तील नवनिर्माण सिमेंट रोडांचे खाली मोठी गॅप निर्माण झाली त्यामुळे दूचाकीचालकांचे येथे अपघात रोखण्यासाठी सदर जागी तातडीने मुरुम भरून रोड समांतर करावा, दोन्ही प्रभागातील मुख्य चौक ठिकाणी संदीप नंदेश्वर, विजय पळसकर, रामदास मस्के यांच्या घराजवळ गति अवरोधक लावण्यात यावे, नूतनबाई खैरवार आंबेडकर चौक रमाई वार्डात त्यांच्या जागेत अज्ञातांनी कॉलमचे खंबे गाडले व येथे खाजगी सामान टाकून जागेवर अस्वच्छतेने परीसरात जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे तातडीने यावर कारवाई करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन नगरपरिषद साकोली प्रशासकीय अधिकारी स्वपनिल हमाने यांना दिले. यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास नगरपरिषदेवर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. निवेदन देतेवेळी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष महेश पोगळे, शिवसैनिक गजेंद्र लाडे, अनिल डोमळे, आकाश मेश्राम, प्रतिभा पारधी, मनिषा पोगडे, स्नेहा मेश्राम, सुनिता भैसारे यांसह येथील नागरिक हेमंत कोटांगले, अभिषेक शामकुंवर, संदीप जांभूळकर, शशिकला चेटूले, लोकेश चेटूले, रामदास मस्के, रितेश उसगावकर, मनिष नंदपूरे, नरेश डोये, क्रिष्णा कापगते, विजया चेटूले, नूतन खैरवार, सोनाली राऊत, रंजू डोंगरे, योगेश्वरी राऊत आणि प्रभागातील महिला पुरूष नागरिक येथे हजर होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com