दिक्षा कऱ्हाडे

वृत्त संपादिका 

 दामोधर रामटेके 

कार्यकारी संपादक 

           

       काळाच्या कालचक्रात केव्हा कुठल्या मानुष्कीचा किंवा कुठल्या कर्तव्याचा अनुभव येईल हे सांगता येत नाही.तद्वतच काळाने पाठ फिरवली म्हणजे व्यक्तीश: मानुस समस्या पुढे हतबल होऊन संकटमय बनतोय याही सत्याला नाकारता येत नाही. 

     मात्र,अशाही संकटमय परिस्थितीत जेव्हा उत्तम मानुष्कीचा आणि हृदयस्पर्शी कर्तव्याचा प्रत्यक्ष अनुभव अनुभवता येतो,तेव्हा मनालाही पाझर फुटतो आणि मन गहिवरून येतय,तद्वतच अश्रूंच्या वाटा आपोआपच मोकळ्या केल्या जातात,असे विदारक चित्र आम्हाला लपविता आले नाही.. 

       सदर प्रसंगानुभव दुसऱ्या तिसऱ्या कुणाचाही नसून,”दखल न्यूज भारतचे मुख्य संपादक प्रदीप रामटेके यांच्याच बाबतीतला आहे हे सत्य आहे आणि स्पष्ट आहे.

       पुण्य कर्माचे मर्मभेदी योग्य संस्कार दखल न्यूज भारतचे मुख्य संपादक प्रदीप रामटेके यांना अनुभूती अंतर्गत माहिती असल्यामुळे ते कुठल्याही प्रकारची मदत करताना कधीच स्वतःचे मोठेपण सार्वजनिक करीत नाही आणि प्रशिध्दी अन्वये स्वतःची वाव्हा सुध्दा ते कधीच करुन घेत नाही.. 

         लोक काय बोलतात आणि काय म्हणतात,यापेक्षा स्वतःला योग्य कर्म कर्तव्यात झोकून देण्याची कार्यपद्धत दखल न्यूज भारतचे मुख्य संपादक प्रदीप रामटेके यांची असल्याने त्यांच्या कर्तव्याची माहिती कुणालाही राहात नाही,या संबंधाने प्रत्यक्ष प्रत्यय अनुभवता आला..

        मुख्य संपादक प्रदीप रामटेके यांचा राजकीय,सामाजिक,प्रशासकीय,उधोग,ठेकेदार स्तरांवर मित्रपरिवार आहे.मात्र ते मित्रांची भनक कुणालाही लागू देत नाही.असे असले तरी मित्रांचे सहकार्य ते जनकल्याण कार्यक्रमासाठी घेतात येवढेच आम्हाला माहिती होते.मात्र ते सर्व स्तरावरील मित्रांच्या मदतीने विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी त्यांना आर्थिक सहकार्य करतात याची पुसटशी कल्पना आम्हाला नव्हती किंवा उपाशी राहणाऱ्या गोरगरीबांसाठी नेहमी खिसा खाली करतात याची जाणीव सुद्धा आम्हाला नव्हती.

      दिनांक २१ नोव्हेंबरचा बोलका व अतिसंवेदनशील कर्तव्य प्रसंग बघताना व अनुभवताना आम्ही स्तब्ध झालोय,मन भरून आले आणि आमचे मुख्य संपादक तुटपुंज्या मिळकतीत सुध्दा अनेकांना सावरण्याचे मोठे कार्य करतात याबाबत जवळून सत्य जाणता आले.

     मात्र,२१ नोव्हेंबरचा प्रसंग त्यांच्या स्वतःच्या बाबतीत आर्थिक मदत घेण्याचा होता.म्हणजेच कालचक्राचा उलटा फेरा होता.

       ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणासाठी गोपनीय पद्धतीने आर्थिक मदत केली होती,त्या विद्यार्थ्यांना कळले होते की प्रदीप सर संकटात सापडले असून आरोग्याने खचले आहेत.यामुळे प्रदीप सरांना आर्थिक मदत केली पाहिजे हा उदात्त हेतू घेऊन ते प्रदीप सरांच्या शोधात होते आणि अचानक त्यांची भेट चिमूर ते जांभूळाघाट मार्गावर जांभूळघाट पासून २ किमी अंतरावर झाली आणि जोराच्या आवाजात हाक कानावर पडली,अहो प्रदीप सर थांबा!

     बाईक थांबवली आणि बाजूला झाडाच्या सावलीत बसून चर्चेला सुरूवात केली असता ते दोन विद्यार्थी म्हणाले प्रदीप सर तुम्हाला प्रसंग आठवतो काय? आमच्या फस्टियरच्या अॅडमिशन साठी तुम्ही एका अधिकाऱ्याला हात जोडून आर्थिक मदत मागून दिली होती.सर,आज आम्ही काम्पूटर इंजिनिअरिंगचे शिक्षण पुर्ण केले ते तुमच्या मदती मुळे आणि तुमच्या मार्गदर्शनामुळेच!

      मात्र,प्रदीप सर प्रतिक्रिया देत नव्हते याचे त्यांना आश्चर्य वाटले आणि प्रश्न केला सर तुम्ही बोलत का नाही? प्रदीप सर म्हणाले केलेली मदत व घेतलेली मदत हा गोपनीय कर्माचा कर्तव्य भाग असतो,यामुळे आपण भाष्य करणे टाळले पाहिजे. 

       यावर त्या दोन विद्यार्थ्यांनी दुसरा प्रश्न केला प्रदीप सर आपण संकटात सापडले आहात व आपले आरोग्य ठिक राहात नाही?यावर प्रदीप सर म्हणाले होय!

    प्रदीप सर होय म्हणताच त्या दोन विद्यार्थ्यांनी १० हजार रुपये घेण्याची त्यांना विनंती केली व म्हणाले सर तुम्ही किती विद्यार्थ्यांना मदत केली हे आम्हाला माहिती आहे,ते सुद्धा तुम्हाला आर्थिक मदत करायला तयार आहेत. 

     प्रदीप सरांनी विद्यार्थ्यांकडून आर्थिक मदत घेण्यास विनम्रपणे नकार दिला व म्हणाले दादांनो भविष्य तुमचे आहे,स्वतःला जपा!

    मी संकटग्रस्त व आरोग्मग्रस्त आहे पण वेडा नाही…आणि एका संवादात आम्हाला आमचे प्रदीप सर न बोलताही कळाले..मन गहिवरून आले,अश्रू अनावर झाले… तद्वतच त्या विद्यार्थ्यांचे अमुल्य कर्तव्य व प्रदीप सरांचा स्पष्ट नकार,या प्रसंगानुरूप मनाचा सखोलपणा कसा असतो हे आम्हाला शिकायला मिळाले. 

         मात्र,प्रदीप सरांनी आम्हाला सांगितले होते हा प्रसंग इथेच ठेवा व इथेच मुरवा! बाहेर पडू देऊ नका..पण,आम्ही त्यांचे ऐकले नाही..

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com