मिलींद वानखडे
मुंबई
लोकशाही पद्धतीने योगेंद्र यादव यांना एक प्रश्नाची चिठ्ठी दिली होती.पण एक तास झाला तरी ते त्यावर कांही बोलेनात.
मग कार्यकर्त्यांनी त्यांच्या भाषणा दरम्यान थेट प्रश्न विचारले,तेही लोकशाही पध्दतीने.त्यावर पण त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.
मग ते काँग्रेस,राष्ट्रवादीचे पोपट आहेत हे लक्षात आल्याने कार्यकर्त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी सभा उधळली.
त्यात योगेंद्र यांना कसलीही धक्काबुक्की करण्यात आली नाही.तरीपण फसवे पुरोगामी,पेड विचारवंत,पाकीट पत्रकार,हरिजन यांनी वंचितच्या नावाने बोंबा ठोकायला चालु केले.
महाविकास आघाडीने लोकसभेला जसे हरिजन,तथाकथित विचारवंत,फसवे पुरोगामी,पाकीट पत्रकारांचा वापर केला.तसाच आता योगेंद्र यादव व तत्सम सारख्यांचा आणि आतापर्यंत आब राखुन असलेल्या विचारवंत कम राजकीय विश्लेषकांचा वापर करुन घेत आहेत असे लक्षात येते आहे.
योगेंद्र यादव या चक्रव्युहात अडकले की स्वतःहुन अडकुन घेतले,कारणे कांहीही असोत हे त्यांनाच माहीत.योगेंद्र यादव यांची पहिली सभा अकोल्यातच कां? याचा खोलात जाऊन विचार केल्यास त्यांचे बोलविते धनी कोण आहेत हे लक्षात येईल.
आणि या गोष्टींची शहानिशा न करता आमच्या कैक विचारवंतांनी भाजप,काँग्रेस,राष्ट्रवादीच्या नरेटीव्हमध्ये अडकून वंचीतच्या कार्यकर्त्यांनी विचारलेला प्रश्न कसा चुकीचा यावर हातभर रकानेच्या रकाने लिहायला सुरुवात केलीय…हे दुःखद आहे..
अरे थोड थांबा,खातरजमा करा,मग वंचीतच्या कार्यकर्त्यावर आरोप करा.पण नाही सर्वात आधी आरोप करणाऱ्याच्या लिस्टमध्ये पहिलं नाव माझंच असावं अशी जणू होड लागलीय दिसते.