तालुक्यातील कन्हान,”ऍग्रो व्हिजन फार्मर प्रोडूसर कंपनी निलज येथे,विभागीय कृषी सहसंचालक व विभागीय कृषी अधीक्षक यांनी भेट दिली…

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी  

पारशिवनी :- तालुका कृषी कार्यालय मार्फत बुधवार दिनांक 21 अक्टुबर 2024 रोजी विभागीय कृषी सहसंचालक नागपूर श्री उमेश घाडगे व विभागीय कृषी अधीक्षक नागपूर श्री.एम.जी.शेंडे,तालुका कृषी अधिकारी राकेश वसु यांची निलज गाव येथील शेतकरी उत्पादक कंपनी ,”कन्हान ऍग्रो व्हिजन फार्मर प्रोडूसर कंपनी”,येथे भेट देऊन कंपनीची पाहणी केली.

          यावेळी विभागीय कृषी सहसंचालक श्री.उमेशजी घाडगे यांनी शेतकरी बांधवांना आधुनिक पद्धतीने धान पिकाबाबत माहिती दिली व आधुनिक तंत्रज्ञानाने धान या पिकाची लागवड तसेच मार्केटिंग विषयी सविस्तर माहिती दिली.

           त्याच प्रमाणे विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी माननीय श्री.एम.जी.शेंडे यांनी धान पिकाच्या ग्रेडिंग व पॅकिंग याविषयी विस्तृत स्वरूपात माहिती शेतकऱ्यांना दिली.

        यावेळी शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक श्री.कमलेश भोयर यांनी विभागीय कृषी सहसंचालक श्री.उमेशजी घाडगे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

       कंपनीचे सदस्य श्री.अभिजीत परसुले यांनी विभागीय कृषी अधीक्षक श्री.एम.जी.शेंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

       यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री.राकेश वसु यांनी शेतकरी बांधवांना कृषी विभागातील विविध योजनेची माहिती दिली…

        या प्रसंगी कार्यक्रमास श्री. एस.पी.कुबडे कृषी पर्यवेक्षक,विवेकानंद शिंदे कृषी सहाय्यक निलज यांनी शेतकरी बांधवांना पिकावरील कीड व रोगाविषयी माहिती दिली.

      सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक( आत्मा) परशिवनी चा श्री.प्रमोद सोमकुवर यांनी शेतकरी गटाबाबत मार्गदर्शन केले.

       कार्यक्रमास ग्रामपंचायत कर्मचारी,रोमन पाहुणे,धनराज चकोले,रवी गजभिये,प्रफुलजी नागपुरे,संकेत आमटे,सुभाष पाहुणे,वासुदेव पंथावने,अश्विन पंथावणे,मनोज टोहने,सचिन चकोले,रामचंद्र चकोले,इत्यादी सह गावातील शेतकरी बांधव मोठी संख्येत उपस्थित होते.

       यावेळी कार्यक्रमाचे संचालन निलज गावाचे कृषी सहायक विवेकानंद शिंदे यानी केले तर शेवटी आभार प्रदर्शन कन्हान ऍग्रो व्हिजन फार्मर प्रोडूसर कंपनीचे संचालक श्री. कमलेशजी भोयर यांनी केले.