प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
भाजपाचे पदाधिकारी, आमदार,खासदार सत्तेच्या बलावर केव्हा काय करतील व काय बोलतील याचा नेम राहिलेला नाही हे भारत देशातील विविध घटनाक्रमावरुन लक्षात येते आहे.
मात्र,उदाहरणार्थ सांगायचे झाल्यास महाराष्ट्र राज्याला मनिपूर राज्य समजून बिड जिल्हातंर्गत आष्टी तालुक्यातील मौजा वाळूज गावातील आदिवासी कुटूंबाची शेती बळकावण्यासाठी भाजपा आमदार सुरेश धस यांच्या पत्नीसह स्थानिक भाजपा गावगुंड्यानी आदिवासी महिलेला विवस्त्र केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आणि महाराष्ट्र राज्यात खळबळ उडाली.
आतापर्यंत अनुसुचित जातीच्या नागरिकांवर उघड मानेने अत्याचार करणाऱ्या घटना महाराष्ट्र राज्यात घडल्यात.आतातर आदिवासी महिलेला विवस्त्र करण्याची भयंकर गंभीर घटना घडली.यावरून हे लक्षात येते की महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब जनता एकनाथ शिंदे सरकारच्या काळात अजिबात सुरक्षित नाही.
ज्या शेतीवर आदिवासी कुटूंबाचा मागील ४० वर्षापासून ताबा आहे व त्या शेतीवर त्यांच्या उदरनिर्वाहाचा भार आहे.त्याच शेतीला बळकावण्यासाठी व त्या शेतीवर ताबा करण्यासाठी भाजपा आमदार सुरेश धस यांच्या पत्नी गावातील भाजपा गावगुंड्याना घेऊन शेतीवर गेल्यात आणि सदर शेतीवर भाजपा गावगुंड्याच्या साहाय्याने ताबा करु लागल्यात.
परंतु आदिवासी महिलेंनी त्यांच्या वहिवाट ताबा शेतीवर भाजपा आमदार सुरेश धस यांच्या पत्नीसह भाजपा गावगुंड्यांना ताबा करण्यासाठी मनाई केली असता,तिला शेतातच विवस्र करुण,तशा पध्दतीचा विवस्त्र व्हिडिओ तयार करून सार्वजनिक केला असल्याचा धक्कादायक व गंभीर प्रकार समोर आलाय.
आदिवासी महिलेचा विवस्त्र व्हिडिओ वंचित बहुजन आघाडीच्या आष्टी तालुकासह बिड जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या हाती सोशलमिडियाच्या माध्यमातून लागला आहे.
सदर आदिवासी महिला आष्टी पोलीस स्टेशनला व आष्टी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात गेली असता,तिच्या गंभीर अत्याचार घटनाक्रमाची त्यांनी तक्रार दाखल करुन घेतली नसल्याचा बेकायदेशीर प्रकार वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे आला.
या घटनाक्रमा संबधाने वंचित बहूजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड.प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना लक्ष देऊन संबंधित सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी विनंती केली आहे.
तद्वतच कायदा व सुव्यवस्था हाताळण्या संबधाने महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास नसल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले.
आष्टी पोलीसांनी २८ आक्टोंबर पर्यंत भाजपा आमदार पत्नी,भाजपाचे गावगुंड यांच्यावर आवश्यक कारवाई करुन कायदेशीर अटक केली नाही तर वंचितचे सर्वेसर्वा हे स्वतः आष्टीला जाऊन उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार असलेल्याचे वंचितच्या बिड जिल्हा पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रश्न हा आहे की,महाराष्ट्र राज्यात सुद्धा भाजपा संबधित व्यक्तींकडून आदिवासी महिलेला विवस्त्र करुन अत्याचार केला जात असेल व अशा गंभीर घटनाक्रमाची पोलीस तात्काळ तक्रार नोंदवून घेत नसतील तर गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्यावर जनता विश्वास दाखवणार नाही व त्यांच्या कार्यशैलीवर नागरिकांना शंका येणे सहाजिकच आहे.
***
महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान…
महाराष्ट्र राज्यात विविध मुद्दयावरून अत्याचार करणाऱ्या घटना घडवून आणणे म्हणजे महाराष्ट्र राज्याची सर्व स्तरावर बदनामी करणे होय आणि महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना अशांत करणे होय.
अत्याचार करणाऱ्या घटनांमुळे महाराष्ट्र राज्याची होणारी बदनामी विकासाच्या आड येतय.उद्या चालून महाराष्ट्र राज्यात व्ववसायीक येणार नाहीत.
यामुळे महाराष्ट्र राज्याचा प्रगत दर्जा कमी होणार आहे.प्रगत दर्जा कमी होणे म्हणजे महाराष्ट्र राज्याची सुसंस्कृत पथ देशविदेशात घालवणे होय.
म्हणूनच अत्याचार करणारे प्रकरणे पुरोगामी महाराष्ट्र राज्याला परवडणारे नाही.याचबरोबर इतर समस्यां बरोबर बेरोजगारीची समस्या अशा घटनांमुळे वाढत असते हे लक्षात घेतले पाहिजे.
तद्वतच अशा अत्याचारी घटना नकळत नागरिकांच्या परस्पर अनेक प्रकारच्या हान्या करीत असल्याचे वास्तव्य आहे.
यामुळे महाराष्ट्र राज्यातील जनतेंनी अत्याचार करणेवाल्यांना अजिबात पाठबळ देऊ नये,असाच आदिवासी महिलेचे विवस्र प्रकरण इशारा देतय..