शिवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्री निमित्त ‘खेळ रंगला पैठणीचा’…

दिनेश कुऱ्हाडे

    उपसंपादक

आळंदी :- येथील शिवस्मृती प्रतिष्ठान आयोजित खास महीलांकरीता रविवार (ता. २२)रोजी नवरात्र उत्सवानिमित्त के.डी.इव्हेंट प्रस्तुत होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.

         या कार्यक्रमात आळंदी शहरातील महीलांनी उपस्थित राहून आगळा वेगळा आनंद घेतला. शिवस्मृती प्रतिष्ठान तर्फे खास महिलांचा सन्मान करण्यासाठी विविध बक्षीसांचे ही आयोजन केले होते. प्रथम क्रमांकास कुलर, द्वीतीय क्रमांकास सोन्याची नथ व पैठणी साडी, तृतीय क्रमांस शेगडी, चतुर्थ क्रमांकास हिटर, पाचव्या क्रमांकास मिक्सर बक्षीस होते, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व महिलांसाठी लकी ड्रॉ स्वरुपात आकर्षक बक्षीस स्वरुपात दिल्या गेल्या. होम मिनिस्टर कार्यक्रमात के.डी भाऊजींनी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेऊन सर्व महिलांचे मनोरंजन केले. विविध प्रकारचे मनोरंजनात्मक खेळ घेत महिलांचे नंबर काढण्यात आले. दिग्दर्शक के.डी. भाऊजी व त्यांची टीम यांनी महीलांचे खुप छान पद्धतीने महीलांचे मनोरंजन केले.

        यावेळी माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, परमानंद भागवत, संतोष खोल्लम, कौशिक जोशी, राजेश वहीले, केतन कानडे, संकेत वाघमारे, मुख्याध्यापिका हेमलता कुऱ्हाडे, माजी नगरसेविका मालती कुऱ्हाडे, मनोज कुऱ्हाडे, तेजस कुऱ्हाडे, सौरभ गव्हाणे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिवस्मृती प्रतिष्ठानचे रोहन कुऱ्हाडे यांनी केले व आभार अमित कुऱ्हाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवस्मृती प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.