शिवतेज मित्र मंडळाच्या वतीने आज नवदुर्गा पुरस्काराचे वितरण… — सायली धनाबाई, भारती रंधवे, डॉ.मोनिका भेगडे, रुपाली पानसरे यांना नवदुर्गा पुरस्कार जाहीर…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी :-

          समाजासाठी सर्वथा प्रेरणादायी ठरणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांचा आळंदी येथील शिवतेज मित्र मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने नवदुर्गा पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.यावेळी आळंदी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आळंदी देवस्थानचे माजी विश्वस्त डॉ.अभय टिळक यांच्या हस्ते व वास्तुशास्त्र तज्ञ आनंद पिंपळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे असे शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे यांनी सांगितले.

         शिक्षण, सामाजिक कार्य, आरोग्य, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, कृषी, उद्योग, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांतील ‘नवदुर्गा’चा सन्मान करण्यात येणार असून यामध्ये प्रामुख्याने भारती रंधवे, विद्या उगले, अनिता झुजम, रुपाली पानसरे, डॉ‌.मोनिका भेगडे, ॲड.निकीता फुटानकर, पूजा घुंडरे, सायली धनाबाई, कमल थोरात, नयना पुरंदरे, नेहा शेळके, पुर्वा सांडभोर, नयना कामठे यांचा नवदुर्गा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.