ऋषी सहारे
संपादक
आरमोरी-
संवेदनशील तरूण म्हणून रक्तदान करणं ही आपली जबाबदारी आणि प्रत्येक तरूणांच कर्तव्य आहे.आपलं रक्त कधी कोणाला उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.जसा एक जवान देशाच्या रक्षणासाठी आपलं रक्त सांडतो तसंच आपलं रक्तही कुणाला तरी जीवनदान देऊ शकत.रक्तदान केल्यावर आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा घटक वाया जाईल अस काहींना वाटते पण तस होत नाही रक्तदानानंतर काही तासांतच आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होते प्रविण राहटे मिञ परिवार व नवयुवक सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाने राबविलेल्या रक्तदानातुन उत्तम समाजसेवा करता येते असे प्रतिपादन मा.जि.सदस्या मनिषाताई दोनाडकर यांनी केले.
कासवी येथे दरवर्षी प्रविण राहटे मित्र परिवार व नवयुवक सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने रक्तगट तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजित जि.प.मराठी प्राथ.शाळा येथे आयोजित करण्यात आले.
यावेळी आरमोरी येथील पो.स्टेशन पोलिस उपनिरिक्षक संभाजी झिंझुर्डे,विजय सुपारे,सहाय्यक शिक्षक मोहमद अन्वर शेख,पञकार प्रविण राहटे,शालिक पञे रोशनी बैस,पो.पा.बावकृष्ण सडमाके,गोविंदा पुसाम,दिवाकर कानतोडे,हरी गुरनुले आदी उपस्थित होते.
यावेळी पोलिस उप.नि.झिंझुर्डे यांनी रक्तदान अनमोल आहे.आपले रक्त गरजू रूग्णांना जीवनदान देऊ शकते,रक्ताची गरज कोणाला कधीही आणि कुठेही लागू शकते त्यामुळे करून दान रक्ताचे ऋण फेडू समाजाचे हे व्रत सर्व तरूणांनी खरोखरच प्रविण राहटे मित्र परिवाराच्या माध्यमातून अंगिकारले पाहिजे असे कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितले त्यासाठी जास्तीत- जास्त तरूणांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आव्हानही झिंझुर्डे यांनी केले.
यावेळी प्रविण राहटे,चक्रदिप गुरनुले,अनुज घोसे,चंदू आकरे,आशुतोष भरणे,भुमेश्वर मरसकोल्हे,मोईन सय्यद,शंकर बगमारे,प्रकाश गुरनुले,संतोष कुमरे,तुषार रकतसिंगे,आदित्य कानतोडे,रुपेश गुरनुले,अविनाश धोगंळे,नानु सयाम,विवेक कांदकुरवार,चेतन कुमरे,श्रीधर कुथे,व इतर युवकांनी रक्तदान शिबिरमध्ये सहभागी झाले.
यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिनेश आठोळे,अनिल प्रधान,ञिबंक खांडखुरे,तोनील मटे,चेतन पुसाम,प्रमोद वाटगुरे,भिमराव चहांदे,राहुल वाटगुरे मनस्विनी सदस्या जागृती आठोळे जयश्री होकम संध्या गुरनुले,प्रभा सयाम,
रक्तदानसंकलसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयातील रक्तसक्रमंण अधिकारी डॉ.अशोक तुमरेटी,सतिश ताडकलवार,कु.योगिता काटेंगे,कु.समता खोब्रागडे,जीवन गेडाम,बंडू कुभांरे यांचे विशेष सहकार्य.