ऋषी सहारे
संपादक
देसाईगंज :- देसाईगंज शहरात मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने १६ सप्टेंबर २०२४ रोजी ईद-ए-मिलादुन्नबी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ईद निमित्ताने मुस्लिम समाज बांधवांची देसाईगंज शहरातून रॅली काढण्यात आली. रॅली मध्ये लहानांपासून ते थोरांपर्यंत मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येत गळाभेट घेऊन सर्वांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या. विविध समाज बांधवांच्या वतीनेही शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
अशातच ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीलालजी कुकरेजा यांच्या घरासमोरील मिरवणूकी प्रसंगी ईद दिनाचे औचित्य साधून सर्व मुस्लिम समाज बांधवांना भारतीय जनता पार्टी देसाईगंज येथील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने बिस्कीटचे वितरण करण्यात आले व पुष्पगुच्छ देत समाज बांधवांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा देऊन सामाजिक एकोपा जपण्यात आला.
दरवर्षी ईद दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी देसाईगंज येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ताच्या वतीने बिस्किटचे वितरण करण्यात येते. सन २०१६ पासून मुस्लिम समाज बांधवांना बिस्कीटचे वितरण करून एकप्रकारे सामाजिक एकोपा जोपासल्या जात आहे.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष सचिन खरकाटे, बिट्टू कुकरेजा, ज्योतू भाऊ तेलतुंबडे, शाम उईके, अशोक कांबळे, रवी प्रधान,अमित फटिंग, अविनाश राघोरते, आशिष राघोते व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.