बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपुर प्रतिनीधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळेच मी आज शिवसेना उपजिल्हा प्रमुख झालो याचा आज मला आनंद आहे. अण्णासाहेब काळे यांचे उद्गार.
शिवसेना पुणे उपजिल्हा प्रमुख पदी माजी सरपंच अण्णासाहेब काळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल नरसिंहपूर येथील ग्रामस्थांच्या हस्ते मंगल कार्यालयासमोर सन्मान करण्यात आला व पुढील वाटचाल करण्यासाठी अण्णासाहेब काळे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
निरा नरसिंहपूर तालुका इंदापूर येथील प्रगतशील बागायतदार व माजी सरपंच अण्णासाहेब काळे यांची शिवसेना पुणे उप जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल माजी सरपंच नाथाजी मोहिते-पाटील सह सर्व ग्रामस्थांच्या हस्ते शाल, श्रीफळ, हार, देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आण्णासाहेब काळे ,नाताजी मोहिते- पाटील सरपंच विलास ताटे–देशमुख, सरपंच नितीन सरवदे, माजी सरपंच जगदीश सुतार, अतुल घोगरे, हनुमंत ठरले, मदन सरवदे, शंकर राऊत, विनोद मोहिते, सहित सर्व ग्रामस्थ व आजी-माजी सरपंच उपस्थित होते.
सन्मान स्वीकारल्यानंतर अण्णासाहेब काळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.