कायदा व सुव्यवस्था कायद्याच्या चौकटीत राहून पूर्ण करा व शांतता राखा… — सूरज जगताप उपविभागीय पोलिस अधीक्षक गडचिरोली. — शांतता कमिटीला संबोधित करताना जगताप यांचे नागरिकांना आवाहन…

ऋषी सहारे 

   संपादक

आरमोरी :- आज दिनांक 23/ 9/ 2024 रोजी सकाळी 11:30 वाजता पोलीस स्टेशन आरमोरी हद्दीतील मौजा आरमोरी शहरातील श्री साई दामोदर मंगल कार्यालय वडसा टी पॉईंट आरमोरी येथे सुरज जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली यांचे अध्यक्षतेखाली आगामी येणाऱ्या शारदा व दुर्गा विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन सण उत्सव सबंधाने शांतता बैठक आयोजित करण्यात आली.

        सदर बैठकीला कैलास गवते पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे आरमोरी, कृष्णाजी गजबे आमदार विधानसभा क्षेत्र आरमोरी, उषा चौधरी तहसीलदार तहसील कार्यालय आरमोरी, माधुरी सलामे मुख्याधिकारी नगरपरिषद आरमोरी, बागुलकर कार्यकारी अभियंता म.रा.वी मंडळ कंपनी आरमोरी तसेच पोलीस स्टेशन आरमोरीचे सर्व अधिकारी, अंमलदार, पोलीस स्टेशन आरमोरी हद्दीतील लोकप्रतिनिधी, सरपंच,पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष, पत्रकार तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक असे मिळून 270 ते 300 स्त्री-पुरुष उपस्थित होते. 

         सदर शांतता बैठकीमध्ये शारदा व दुर्गा विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन सणाचे अवचित्याने कचरा साफसफाई, कचरापेटी,विद्युत व्यवस्था, अति पाऊस झाल्यामुळे खड्डे झालेल्या रस्त्याची दुरुस्ती, आरमोरी शहरातील महामार्गावर बॅरिकेटिंग तसेच सर्व देवी व शारदा स्थापना ठिकाणी CCTV बसवणे व मंडपाच्या चारी बाजूंनी पुरेशी लाईट व्यवस्था करणे बाबत.

             अशा विविध विषयावर उपस्थितान कडून प्रश्न उपस्थित झाल्याने सदर समस्येचे निराकरण करण्याचे विविध विभागाचे शांतता बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले तसेच कृष्णाजी गजबे आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र यांनी शांतता बैठकीला उपस्थित जण समुदायास आरमोरी शहरातील नवरात्र उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात भक्ती भावानी साजरा करण्यात येत असतो.

       सदर उत्सव हा विदर्भातच नाही तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक आहे तरी सदर नवरात्र उत्सव शांततेने पार पाडण्याचे व पोलीस प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन केले.

          सदरची शांतता बैठक सकाळी 11:30 वा. ते दुपारी 1:30 वा. संपविण्यात आली. सदर बैठकीला उपस्थित असलेल्या नागरिकांना पोलीस स्टेशन आरमोरीच्या वतीने चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली.

          कार्यक्रमाचे संचालन ज्योती राक्षे तर आभार प्रदर्शन कडाले यांनी केले.