वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत… 

ऋग्वेद येवले

  उपसंपादक 

दखल न्युज भारत

साकोली :- वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची सत्र २०२३-२४ ची गुणवत्ता यादी नुकतीच प्रकाशित करण्यात आली. यात वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय साकोली येथील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत आपने स्थान निश्चित करून दरवर्षीची परंपरा कायम ठेवली.

               एमपीएड परीक्षेत पार्वती मीना, प्रियांका व आशिष वशिष्ट हे तीन विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत अनुक्रमे तिसरे, पाचवे आणि नववे मेरीट ठरले आहेत.

            त्याचबरोबर बीपीएड परीक्षेत विकी यादव, सपना बैरवा व शकुंतला मीना हे तीन विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत अनुक्रमे सातवे, नववे व दहावे मेरीट ठरले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चतुर्वेदी व सर्व प्राध्यापकांना दिले आहे.

           या महाविद्यालायचे अनेक विद्यार्थी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सुवर्णपदकाचे मानकरी ठरत गुणवत्ता यादीत नैपुण्य प्राप्त केले आहेत.

           या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्रह्मानंद करंजेकर, संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चतुर्वेदी, डॉ.राजश्री, अशोक कुमार मीना, सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी केले आहे.