राजगुरुनगर मध्ये चार वर्षांच्या चिमुकल्यावर अमानुषपणे अनैसर्गिक अत्याचार…

दिनेश कुऱ्हाडे 

    उपसंपादक

खेड : खेड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. चार वर्षांच्या चिमुकल्यावर अमानुषपणे अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला आहे. ही घटना राजगुरूनगरमध्ये घडली आहे.

            विजय ताठोड वय 24 असं या प्रकरणातील आरोपीचं नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

          घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये 4 वर्षीय मुलावर आरोपीने अमानुषपणे अनैसर्गिक अत्याचार केला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. राजगुरुनगर शहरात वास्तव्यास असणारा चिमुकला घराजवळ खेळत असताना त्याला खाऊचे आमिष दाखवून घरात घेऊन जाऊन या मुलावर अमानुषपणे अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला.

           या प्रकरणी राजगुरुनगर पोलीस ठाण्यात नराधम विजय ताठोड याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान चिमुकल्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.