संपादकीय
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
चंद्रयानच्या यशस्वी मोहिमे संबंधाने लोकसभेत चर्चा सुरु असताना रात्रो १० वाजून ५३ मिनिटांनी दक्षिण दिल्लीचे भाजपा खासदार रमेश बिधूडी लोकसभेत बोलताना बसपा खासदार दानीश अल्ली यांच्यावर ताशेरे ओढताना खालच्या स्तरावरील भाषेचा उपयोग करीत त्यांना सार्वजनिक अपमानित केले असल्याचा घटनाक्रम घडला.
बसपा खासदार दानीश अल्ली यांच्यावर अभद्र टिपनी करताना भाजपा खासदार रमेश बिधूडी म्हणाले ए आतंकवादी,अबे उग्रवादी,भडवा,कटवा,मुल्ला,बाहेर ये बघतोय,असे मानहानीकारक व लज्जीत करणारे शब्द लोकसभा सत्र सुरु असताना लोकसभेतच बोलले.
भाजपा खासदार रमेश बिधूडी यांचे लोकसभेतील असे शब्द ऐकून नवीन लोकसभा भवनाची मान शरमेंनी खाली झुकली असेल व नवीन लोकसभा भवन म्हणत असेल गुंडगिरी प्रवृत्तीची,मानहानीकारक आणि बेइज्जत करणारी भाषा बोलणाऱ्या बेताल लोकप्रतिनीधींसाठी हे नवीन लोकसभा भवन बांधण्यात आले आहे काय?लायकी नसलेल्या लोकप्रतिनीधींसाठी लोकसभा भवन असते काय?”होय,असभ्य भाषेत बोलणारे खासदार हे लायकी नसणारेच असतात यात किंचितही संसय उरत नाही.
कारण अशा लोकप्रतिनींधीमध्ये सुसंस्कृतपणा नसतो,समजदारी व स्वयंमता नसते,सक्षमता व कार्यक्षमता नसते,अनुभव नसतात व अशा लोकप्रतिनींधीना कार्यभाग व कार्यभाव माहिती नसतो.अर्थात असे लोकप्रतिनीधी मुजोरीच्या परिभाषेने देशा बरोबर परदेशात देशाच्या सांसदीय लोकशाहीला डॅमेज करण्याचे काम करतात.हे या देशातील पक्ष संस्काराचे दुर्भाग्य आहे काय?यावर भाजपाने विचार करायला पाहिजे असाच लोकसभेतील अपमानजनक घटनाक्रम आहे.
तद्वतच भाजपा खासदार रमेश बिधूडी यांच्या लोकसभेतील टिपनीने अख्या जगात संस्कृत,सार्वभौमत्व देशाच्या लोकशाही परंपरेतील सभ्यतेचे वाभाडे निघाले व जगातील राजकीय पटलावर भाजपा खासदारांचे चारित्र्य उघडे पडले.
देशातील मतदार हे लोकप्रतिनीधींना निवडून देतात तेव्हा लोकसभा सुरु असताना एखाद्या खासदाराला शिव्या देण्यासाठी निवडून देत नाही तर या देशातील नागरिकांच्या सुरक्षासंबंधाने व उन्नतीसंबंधाने काम व कार्य करण्यासाठी निवडून देतात.तद्वतच देशावर कुठल्याही पध्दतीची आच येणार नाही या अनुषंगाने कर्तव्य पार पाडण्यासाठी निवडून पाठवितात.
नागरिकांची व देशाची चिंता नसलेले लोकप्रतिनीधी लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले तर ते देशाचे वाटोळे करतात व देश देशोधडीला लावतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे लोकसभेतील चर्चे दरम्यान अयोग्य भाषेचा वापर करणे होय व भांडवलदारांच्या हितसंबंधांने वारंवार निर्णय घेण्याची कार्यपद्धत होय.
बसपा खासदार दानीश अल्ली यांच्यावर खालच्या भाषेत ताशेरे ओढताना जो क्रोध भाजपा खासदार रमेश बिधूडी मध्ये जाणतो आहे,तो क्रोध लोकशाही परंपरेला व स्वातंत्र्याच्या अभिव्यक्तीला शोभा देणारा नाही असाच आहे.एवढ्या निच्च व खालच्या स्तरावरील प्रवृत्तीचे दर्शन देशातील नागरिकांना भाजपा खासदार रमेश बिधूडी मुळे झाले.
****
राजीनामा देण्याची गरज नाही…
बसपा खासदार दानीश अल्ली यांनी राजीनामा देण्याची गरज आहे काय?तर बिल्कुल नाही.
कारण त्यांच्या कृतीमुळे किंवा वृत्तीमुळे त्यांना मान खाली घालावी लागली नाही,आणि देशाचे व देशवाशियांचे नुकसान होईल असेही त्यांनी काही केले नाही.
यामुळे त्यांच्या लोकसभा मतदार संघातील नागरिकांच्या सेवेसाठी,त्यांच्या कार्यासाठी व विकासासाठी खासदार म्हणून सेवटच्या क्षणापर्यंत मतदारांसोबत राहणे गरजेचे आहे.तद्वतच खासदार म्हणून राहणे हाच मतदारांचा सन्मान असेल.
***
खासदार संजयसिग..
लोकसभेतील अपमानजनक घटनाक्रम नंतर आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजयसिग यांनी मत व्यक्त करताना म्हटले की,”भाजपा पक्ष हा लुच्चे,लफंगे,आणि गुंड्याचा आहे.
यामुळे या पक्षाच्या खासदारांकडून,नेत्यांकडून चांगल्या कर्तव्याची अपेक्षा नाही.
याचबरोबर बसपा खासदार दानीश अल्ली यांच्यावर केलेल्या अभद्र टिपनी बाबत खासदार रमेश बिधूडी यांना सर्व बाजूंनी फैलावर घेतले व देशाच्या लोकशाही इतिहासातील शर्मनाक घटना असल्याचा तिव्र शब्दात खेद व्यक्त केला.
****
खासदार जयराम रमेश..
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी व खासदार जयराम रमेश यांनी म्हटले की,”बसपा खासदार दानीश अल्ली यांना,भाजपा खासदार रमेश बिधूडी यांनी लोकसभेत दिलेल्या अभद्र शिव्यांचा लांच्छनास्पद प्रकार सर्व खासदारांची बेइज्जती व मानहानी करणारा आहे.
असा प्रकार देशाच्या लोकशाही कालखंडात पहिल्यांदा घडलाय आणि गंभीर आहे.अशा शब्दांचा उच्चार लोकसभेत करणे म्हणजे सांसदीय लोकशाहीला घातक व मारक आहे.
खासदार रमेश बिधूडी यांच्या अभद्र शिव्यांची भर्त्सना जेवढी केली जाईल तेवढी कमी असल्याचे म्हटले आहे.
***
रक्षामंत्री राजनाथसिंह…
भाजपा खासदार रमेश बिधूडी यांच्या अभद्र शिव्यांनी लोकसभेत गदारोळ होताच देशाचे रक्षामंत्री राजनाथसिंह यांनी खेद व्यक्त करीत लोकसभेची माफी मागितली…
***
लोकसभा व राज्यसभा अध्यक्ष,प्रधानमंत्री निरपेक्ष कर्तव्यातंर्गत मजबूत लोकशाहीचे साक्षदार ठरावेत…
देशात केंद्र सरकार कुठल्याही पक्षाचे असो.मात्र, लोकसभा आणि राज्यसभा अध्यक्ष व प्रधानमंत्री हे लोकशाही अंतर्गत निरपेक्ष कर्तव्याचे धनी असावेत.ते निरपेक्ष कर्तव्याचे धनी असले तर खासदार हे मर्यादा ओलांडत नाही.
लोकशाहीच्या कक्षेत राहून निरपेक्ष कार्य व कर्तव्य पार पाडणारे लोकसभा व राज्यसभा अध्यक्ष आणि प्रधानमंत्री हे कर्तव्यदक्ष असतात आणि देश व देशातील नागरिक भयमुक्त जिवन जगतात.
वरील प्रमाणे जबाबदारीचे चित्र रेखाटणारे लोकसभा व राज्यसभा अध्यक्ष आणि प्रधानमंत्री निरपेक्ष कर्तव्यातंर्गत मजबूत लोकशाहीचे खांब असतात..हे विसरता येत नाही..
तद्वतच जे लोकप्रतिनिधी म्हणजे खासदार हे देशातील नागरिकांच्या हिताच्या आड येतात,सभ्य संस्कृतीला मारक ठरतात त्यांना लोकप्रतिनिधी म्हणायचे काय?याचा विचार लोकसभा व राज्यसभा अध्यक्ष आणि प्रधानमंत्री यांना करायला लावणारा भाजपा खासदार रमेश बिधूडी याच्या अभद्र शिव्यांचा घटनाक्रम..
***
लोकशाहीला कलंकित करणारे खासदार लोकसभेत असतील तर देशाचे भविष्य व देशातील नागरिकांचे भविष्य अंधारात आहे हे लक्षात घेतले पाहिजे…