ऋषी सहारे

संपादक

 

आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा परिसरामध्ये पहिल्यांदाच वाघाने नर बळी घेतल्यानंतर शेतकरी शेतमजूर शालेय विद्यार्थी दहशतीखाली जीवन जगत आहेत .वाघाचा बंदोबस्त करण्यासंदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सह मुख्य वनसंरक्षक विभागीय वन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते .परंतु वाघाच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने कोणतेच ठोस पाऊल न उचलल्यामुळे अखेर 22 सप्टेंबर रोजी वाघाच्या बंदोबस्तासह जोगीसाखरा येथे 33 केवी सब स्टेशन मंजूर करण्यात यावे. एम एस ई बी चे कर्मचारी मुख्यालय राहावे. पाथरगोटा या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत देण्यात यावी. अशा विविध मागण्या घेऊन आरमोरी येथील भगतसिंग चौकामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आला आंदोलनादरम्यान विभागीय वन अधिकारी धनंजय वायभासे यांनी भेट देऊन नरबळी वाघ सध्या भंडारा जिल्ह्यात असल्याचे सांगून वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसान भरपाईसाठी सध्या मिळत असलेले पंचवीस हजार रुपये पेक्षा अधिक रक्कम मिळण्यासाठी शासनाकडे अहवाल सादर केले जाईल तसेच व्याघ्र क्षेत्रामध्ये व्याघ्र संरक्षण मजुरांची संख्या वाढवून देण्याचे आश्वासन दिले. तर एम एस ई बी चे कार्यकारी अभियंता डोंगरवार यांनी 33 केवी स्टेशन जोगीसाखरा येथे मंजूर झाले असून दीड वर्षात लावून देण्याचे आश्वासन आंदोलन करताना दिले. जबाबदार अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतरही आंदोलनकर्त्यांचे चक्काजाम प्रक्रिया सुरू असल्यामुळे आरमोरीचे ठाणेदार मनोज काळबांडे यांनी आंदोलन कर्ते सूत्रधार संदीप ठाकूर, दिलीप घोडाम ,सुनील नंदनवार, वृंदाताई गजभिये, राजू आखरे ,पुरुषोत्तम मैद ,देवचद दोनडकर ,गंगाधर कुमरे ,सुनिल कुमरे, प्रदिप सडमाके ,नत्थु ढोंगे इत्यादींना अटक करुन सुटका करण्यात आली. या आंदोलनात जोगीसाखरा, पळसगांव ,सालमारा, पाथरगोटा,आष्टा,कासवी,अन्य गावालगत नागरिक स्त्री, पुरुष विद्यार्थी मोट्या संख्येने सहभागी झाले होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com