जिल्हा व्यवसाय शिक्षण  कार्यालयात वृक्षारोपण…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

               वृत्त संपादिका 

चंद्रपूर :- जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय चंद्रपूर परिसरात येथे अनेक प़जातीचे वॄक्षारोपण करून हरीत परिसर मोहीम सुरू करण्यात आली.

           जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय चंद्रपूर हे जिल्हाधिकारी निवास परिसरात वसलेले आहे. विस्तीर्ण असा परिसर या कार्यालयाला लाभलेला आहे. तत्कालीन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी स्व.नितीन जुनोनकर,सुशिल भुजाडे यांनी पुढाकार घेऊन कार्यालय परिसर हरीत करण्यास सुरुवात केली.

             कार्यालयाचे मोठे आवार लक्षात घेऊन
विद्यमान जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी बोनगीरवर सर यांनी हरीत परिसर मोहीमेची संकल्पना पुढे ठेवली.

            यातून आज कार्यालयीन कर्मचारी व उपस्थितांनी
विवीध झाडे लावून या मोहिमेस सुरुवात केली.
आज फळझाडांचे विवीध झाडे लावण्यात आली.

            यावेळी प्रा. महेश पानसे, अमोल धात्रक,विलास विरुटकर,वासूदेव तायडे, महेश चौधरी,श्रावण शेट्टी उपस्थित होते.
                याशिवाय अजून अनेक प्रजातीची झाडे लावून या परिसरात वर्षंभर हरीत परिसर मोहीम राबविण्यात येणार आहे.