अति प्रभावित मेघा पाणलोट प्रकल्प अंतर्गत मौजे उशीखेडा येथे सविस्तर प्रकल्प आढावा बैठक संपन्न…

निलय झोडे 

उपसंपादक

दखल न्यूज भारत

सडक अर्जुनी तालुक्यातील अति दुर्गम भागातील 35 ग्रामपंचायतीमध्ये भारत रुरल लाईव्हलीहुड फाउंडेशन, दिल्ली व युवा रुरल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने अति प्रभावित मेघा पाणलोट प्रकल्प राबविण्यात येत आहे , या अनुषंगाने आज रोजी मौजे उशीखेडा येथे सविस्तर प्रकल्प अहवाल सहभागीय ग्रामीण मूल्यांकन कार्यक्रम घेण्यात आला. 

          जीआयएस आधारित सविस्तर प्रकल्प आराखडा एकूण पाणलोट क्षेत्र 406.39 हेक्टर क्षेत्रा पैकी 232.52 हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले, प्रकल्प योजनेत शेतकऱ्यांच्या मागणी केलेल्या जनावराचे गोठे 44, कुक्कुटपालन शेड 19, शेळी पालन शेड 35 या बाबींना निश्चित करण्यात आली, सविस्तर प्रकल्प अहवालाच्या माध्यमातून पाणलोटाचे क्षेत्र निश्चित करून कोणती कामे घेता येतील व त्याची माहिती शेतकऱ्यांना देऊन आपलं गाव पाणीदार करणे सोबतच गाव समृद्ध करणे. महिला बचत गटात देण्यात येणाऱ्या योजना महात्मा गांधी रोजगार हमी योजना इत्यादी बाबत चर्चा करण्यात आली.

          या कार्यक्रमास भारत रुरल लाईव्हलीहूड प्रकल्पाचे राज्यस्तरीय तांत्रिक मार्गदर्शक श्री डॉक्टर सुमित रॉय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

        पाणलोटाचे कामे करून गावातील जमिनीतील पाण्याचा स्तर वाढविण्यात येणार आहे, सोबतच प्राथमिक स्तरावरील रोजगारांच्या समस्या सोडविण्या करिता संस्थेकडून राबविण्यात येत असलेल्या अति प्रभावी मेघा पाणलोट प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे असे मत प्रमुख पाहुणे श्री डॉक्टर सुमित रॉय सरांनी ग्रामस्थांना सांगितले.

         या प्रकल्पाच्या माध्यमातून मनरेगाच्या कामाला गती देऊन कुटुंबाचे उत्पन्न दुप्पट वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार आहेत, शेततळे, विहीर, ,WAT , 5% पाणलोट उपचार पद्धती इत्यादी पाणलोटाचे उपचार सांगून, याचे महत्त्व गावकऱ्यांना समजावून सांगण्यात आले.

        उपजीविकेच्या कामाला भर देण्यात येणार आहे असे प्रतिपादन श्री नितेश बोपचे रिजनल कॉर्डिनेटर बी आर एल एफ यांनी मांडले. गावस्तरावरील पाणलोटाचे कामे राबवून सोबतच उपजीविकेचे साधने निर्माण करणे ,महिला गट सक्षम करणे अशा विविध योजना सविस्तर प्रकल्प अहवाल आढावा घेताना मान्यवरांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसोबत मांडण्यात आला.

         या कार्यक्रमा करिता उशीखेडा गावच्या सरपंच सौ शोभाताई मडावी , उपसरपंच श्री अजहर चिस्ती , रोजगार सेवक रामेश्वर नहाने , तंटामुक्ती अध्यक्ष धर्मशाळा मडावी , अंगणवाडी सेविका-कल्पनाबाई कोटांगले , प्रगती स्वयंसहायता महिला बचत गटाचे अध्यक्ष वेदवताबाई उईके व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आनंद सूर्यवंशी सर टीम लीडर वाय आर ए यांनी केले , तर कार्यक्रमाच्या यशस्वी करिता टीम वाया आर ए कडून परिश्रम घेण्यात आले.