सावधान!..चिमूर शहरात डेंग्यूचा धोखा वाढतोय… — विस दिवसात 29 रुग्णांची नोंद..

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी..

चिमूर – 

         जुलै-ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक खाली जागेतील प्लॉटवर व तालुक्यातील इतर ठिकाणी पाणी साचले आहे.याचबरोबर अनेक भागातील नाल्याची सफाई न झाल्याने अनेक भागात गटारगंगा वाहत आहेत.

      त्यामुळे शहरात व ग्रामीण भागात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.गटारगंगा व अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

        चिमुर उपजिल्हा रुग्णालयात वीस दिवसात 29 डेंगू रुग्णाची नोंद झाली असून आज घडीला आठ ते दहा रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत तर काही रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत.वीस दिवसात 29 रुग्णांची नोंद झाल्याने चिमुरकरानो सावधान,शहरात डेंग्यूचा धोखा वाढतोय?असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे……

       सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असून मागील चार पाच दिवसापासून पावसाने अनेक भागात उसंत दिली आहे.त्यामुळे नागरीकांना चांगलाच उकाळा सहन करावा लागत आहे.या गर्मीमुळे तालुक्यात सर्दी,खोकला ताप,मलेरिया,डेंगू सारख्या आजाराचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

       खाजगी दवाखान्यासह,प्राथमिक आरोग्य केंद्र,उपजिल्हा रुग्णालयाच्या ओपीडी मध्ये रुग्णसंख्या वाढली आहे.

          चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात वीस तारखेपर्यत 29 डेंगू रुग्णांची नोंद झाली असून,त्यात 10 पुरुष,12 महिला तर 7 मुलांची नोंद करण्यात आली आहे.तर आजघडीला आठ ते दहा डेंग्यूचे रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

        हा आकडा चिमूर उपजिल्हा रुग्णालयातील असून खाजगी दवाखान्यातील डेंगू रुग्ण वेगळेच आहेत.याकडे शहरातील नगर परिषद व तालुक्यातील ग्राम पंचायतचे दुर्लक्ष होत आहे.

       अनेक ठीकाणी फवारणी मशीनने धुव्वा सोडण्याचे काम शहरात दिसून येत नाही.मात्र डेंग्यूच्या या रुग्ण संख्येवरून चिमूर शहरासह तालुक्यात डेंग्यूचा धोखा वाढला आहे.हा डेंग्यूचा आकडा चिमुरकरांना सावधानतेचा इशारा देत आहे. 

******

बाॅक्स..‌..

      बदलणाऱ्या लाइफस्टाइलने,परिसरातील अस्वच्छतेने,घरातील एसी,कुलर मधील पाण्यात डेंग्यूच्या डासाची निर्मिती होते.

      त्यामुळे नागरिकांनी हप्त्यातून एक दिवस ड्राय डे पाळणे गरजेचे आहे.तर साधा ताप आल्यास वेळीच रक्ताची तपासणी करून जवळच्या रुग्णालयात उपचार करावे..

       डॉ.अश्विन अगडे 

वैद्यकीय अधिकारी,उपजिल्हा रुग्णालय चिमूर