रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधि
महिला बचतगटांना कर्जपुरवठा करण्यात अग्रेसर असणाऱ्या क्रेडीट अॅक्सेस ग्रामीण लिमिटेड कंपनी तर्फे चिमुर तालुक्यातील तिन गुणवंत विद्यार्थीनींना प्रत्येकी १५ हजार रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
सामाजिक बांधीलकी म्हणुन राबविण्यात आलेल्या या उपक्रमात चिमुरचे अप्पर जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थीनीना शिष्यवृत्ती व प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले.
ग्रामीण भागातील बचतगटाच्या महिलांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने कर्ज पुरवठा करण्यात आले. त्या बचतगटातील महिलांच्या गुणवंत मुलींना या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. यात स्नेहा देवमन धारणे, कशिश मनोज बांबोडे, पलक विनेश वाघ या विद्यार्थीना शिष्यवृत्ती देण्यात आली.
यावेळी चिमुरचे अप्पर ‘जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे, क्रेडीट अॅक्सेस लिमिटेड कंपनी नागपुर क्षेत्रीय व्यवस्थापक शशिकांत लोखंडे, चिमुर शाखेचे व्यवस्थापक महेश पत्रे, उपव्यवस्थापक अजय गजभीये, केंद्र मॅनेजर किशोर लेनगुरे, अरविंद खंडाळे, धम्मानंद मेश्राम, विक्की हाडगे, प्रफुल घाटोळकर, पुजा बोरकर, रिना वाडगुरे आदीसह विद्यार्थी- पालक उपस्थित होते.