वैद्यकीय उपचाराकरिता डॉ. सतिश वारजूकर यांच्याकडून आर्थिक मदत..

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

 चिमूर :- विधानसभा क्षेत्रातंर्गत नागभीड तालुक्यातील मेंढा येथील मुक्ताताई विजय समर्थ या बरेच दिवसापासून आजारी आहेत.

    घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्यांनी तालुका काँग्रेस कमिटी नागभीड कार्यालय येथे उपचाराकरिता आर्थिक मिळण्याबाबत राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमुर विधानसभा क्षेत्र डॉ.सतिश वारजुकर यांना अर्ज सादर केला होता.

      त्या अर्जाची दखल घेत आज डॉ.सतिश वारजुकर यांनी मेंढा येथे जाऊन आर्थिक मदत केली.यावेळी सोबत नागभीड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद चौधरी,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पुरुषोत्तमजी बगमारे,काँग्रेस युवा कार्यकर्ते संदीप कोरे उपस्थित.