२६ जुलैला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन…

     रामदास ठूसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चिमुर :- 

          वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चिमुर तालुक्यातील सामान्य जनतेच्या विविध समस्या व सार्वजनिक समस्या शासना मार्फत तात्काळ सोडवुन जनतेला दिलासा देण्यासाठी २६ जुलै २०२४ रोज शुक्रवारला सकाळी १० वाजता चिमुर तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे.

            या धरणे आंदोलनात महाराष्ट्र राज्य सदस्य कुशाल मेश्राम, विदर्भ प्रमुख डॉ. रमेशकुमार गजभे, विदर्भ समन्वयक अरविंद सांदेकर, जिल्हा प्रभारी राजेश बोरकर, जिल्हा कार्याध्यक्ष जयदीप खोब्रागडे, जिल्हा सल्लागार डॉ. प्रेमलाल मेश्राम, जिल्हा आयटी सेल प्रमुख लिलाधर वंजारी, जिल्हा सल्लागार नारायण कांबळे गुरुजी, ज्ञानेश्वर नागदेवते, शहर अध्यक्ष शालीक थुल, जिल्हाध्यक्ष युवा आघाडी शुभम मंडपे, जिल्हाध्यक्षा महिला आघाडी कविता गौरकर, जिल्हा महासचिव शैलेंद्र बारसागडे, जिल्हा उपाध्यक्ष अश्विन मेश्राम, राजु अलोणे, निलकंठ शेंडे, विनोद देठे, तालुका अध्यक्ष डॉ. बाळासाहेब बन्सोड, महासचिव लालाजी मेश्राम, कोषाध्यक्ष जनार्धन खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

              या धरणे आंदोलनात चिमुर तालुक्यातील जबरानजोत व अतिक्रमण धारक शेतकरी कुटुंबाना तात्काळ पट्टे देण्यात यावे तसेच तिन पिढयांचा पुरावा मागणी रद्द करावे.ओबीसींची जातनिहाय जनगणना करून त्यांचे आरक्षण वाढविण्यात यावे.

         वन्य प्राण्यापासुन शेतकऱ्यांना संरक्षण द्यावे तसेच वन्य प्राण्यांपासुन किंवा नैसर्गिक हानी झाल्यास शेती प्रत्यक्ष करणाऱ्याना लाभ मिळावा.नोकरभरती प्रक्रिया गतीमान करून बेरोजगारीला आळा घालावा. दोन वर्षापासुन रोजगार हमी योजनेतील मजुरीचे पैसे काम करणाऱ्या कामगारांना त्वरीत देण्यात यावे. शेतीमालाला हमीभाव देण्यात यावा आदी मागण्याचा समावेश आहे.

          या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष डॉ. बाळासाहेब बन्सोड, महासचिव लालाजी मेश्राम यांनी केले आहे.