नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या- डॉ.सतिश वारजुकर…

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी..

चिमूर:-

       मोखाबर्डी उपसा सिंचन प्रकल्पातील वडाळा कालव्याचे धरण फुटल्याने चिमूर तालुक्यातील महालगांव येथील शेतकऱ्यांच्या शेतांत पाणी गेल्याने शेत पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे अशी माहिती शेतकऱ्यानी राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ.सतिश वारजुकर यांना दिली. 

        त्यांनी लगेच माहालगांव काळू येथे जाऊन शेत पिकांची पाहणी केली व लगेच उपसा सिंचन कालव्याच्या हेडकॉटरला भेट दिली व याबाबतची संपूर्ण माहिती मोखाबर्डी उपसा सिंचन चे संबंधित अभियंता यांना फोन द्वारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी असे सांगितले.

        यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस गजानन बुटके,चिमूर तालुका काँग्रेस सेवा दल अध्यक्ष किशोर शिंगरे,चिमूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश अगडे,युवक काँग्रेस उपाध्यक्ष मंगेश घ्यार,चिमूर शहर काँग्रेस प्रमुख गुरु जुनघरे,बंडू बोरकर,प्रवीण खवसे आदी कॉग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.